आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०८/१२/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण १७ शके १९४७
दिनांक :- ०८/१२/२०२५,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५२,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति १६:०४,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति २६:५३,
योग :- ब्रह्मा समाप्ति १७:०१,
करण :- कौलव समाप्ति २७:१०,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – ज्येष्ठा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:१३ ते ०९:३६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:५१ ते ०८:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:३६ ते १०:५९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:०७ ते ०४:२९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०४:२९ ते ०५:५२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
घबाड १६:०४ प., चतुर्थी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण १७ शके १९४७
दिनांक = ०८/१२/२०२५
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील. चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल. सर्व कामांचा ताळमेळ साधावा.
वृषभ
आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनात परोपकाराची भावना जपाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. थोरांचा आशीर्वाद मिळेल.
मिथुन
मनाची चलबिचलता जाणवेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जुन्या विचारात अडकून पडू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी.
कर्क
वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल.
सिंह
आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. हित शत्रूपासून सावध राहावे. योग साधनेवर भर द्यावा.
कन्या
आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. जुगारातून लाभ संभवतो. मित्रांसोबत फिरायला जाल.
तूळ
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल.
वृश्चिक
सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल.
धनू
गोड बोलून कामे करून घ्याल. सर्वांची आपुलकीने चौकशी कराल. मनातील कडवटपणा दूर करता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.
मकर
आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल. हातातील कामातून यश येईल.
कुंभ
कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा. दूरच्या कामातून लाभ संभवतो. मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.
मीन
नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. कामे जलद गतीने पूर्ण होतील. व्यापारी वर्ग खुश असेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



