पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे पहिल्या प्रस्तावानुसार करा-आमदार लहामटे

अकोले प्रतिनिधी
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे पहिल्या प्रस्तावानुसार नाशिक -सिन्नर -अकोले सरहद्द मार्गे -संगमनेर -आळेफाटा -पुणे मार्गेच गेली पाहिजे. ह्या अत्यंत महत्वाच्या मागणीसाठी लक्षवेधी आंदोलन आज नागपूर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात केले.
पुणे -नाशिक रेल्वे प्रवास कमीत कमी वेळेत व्हावा या साठी ह्या हाय स्पीड रेल्वेची मागणी आहे
जर हा रेल्वे मार्ग बदलला गेला तर नक्कीच वेळ वाढणार आहे. अकोले तालुक्यातील हजारो विद्यार्थी,कामगार वर्ग रोजगारासाठी पुण्याला जात असतो . येथील शेतीमालाची देवाणघेवाण रेल्वे मूळे सहज शक्य होणार आहे
त्याचसोबत अकोले तालुक्याला पर्यटन सौंदर्य लाभलेले आहे दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येतात.
जर अकोले सरहद्दीतून रेल्वे गेली तर पर्यटनाच विकास होणार आहे .
येथीक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ह्या रेल्वे मार्गाविषयी अधिवेशन संपल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांची भेट घेणार आहे.असे लहामटे म्हणाले


