इतर

टिटवी येथे मान्हेरे केंद्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन स्पर्धा संपन्न

एस. के. जाधव /प्रतिनिधी
कोकणवाडी दि 10 अकोले तालुक्यातील खिरविरे बिटातील व मान्हेरे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शन स्पर्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टिटवी या ठिकाणी संपन्न झाल्या.

केंद्रातील 10 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनि आपल्या अंगी असलेल्या कला गुणांच सुंदर सादरीकर केले. स्पर्धेत हस्ताक्षर, वकृत्व, कथा कथन, वैयक्तिक गीत गायन, समूह गीत गायन, संस्कृतिक कार्यक्रम अश्या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनि आपले नैपुण्य दाखवले.

कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख सुनील घुले यांनी केले.टिटवी गावचे सरपंच तुकाराम वायळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमिला मेमाणे, उपाध्यक्ष भरत मुंढे,माजी सरपंच तुकाराम सखाराम मुंढे, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य,तरुण मित्र मंडळ, अंगणवाडी ताई, भजनी मंडळ यांनी कार्यक्रमाला भरभरून साद दिली. शासन परिपत्रक नियमावली नुसार स्पर्धा नियोजन पूर्वक संपन्न करण्यासाठी केंद्रातील सर्व शिक्षक बांधवांनी मोलाचं सहकार्य केले.

टिटवी शाळेचे मुख्याध्यापक रामनाथ मुंढे,राजेंद्र देशमुख यांनी उत्तम नियोजन केले होते. सर्जुन बांबेरे,देवराम बांडे,पांडू खाडे या शिक्षकांनी मुलांच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली.आदर्श केंद्र मुख्याध्यापक विठ्ठल बांडे यांनी स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या स्पर्धकांना पेन बक्षीस देऊन कौतुक केले. केले.वाकी,टिटवी, मान्हेरे, शेणीत शाळेतील मुलांनी उपस्थितांची मने जिंकली.लहान गटात डामसेवाडी, आंबेवांगन, लाडगाव, ठोकळवाडी, देवीचीवाडी, सोकेवाडी शाळेतील मुलांनी सुंदर कार्यक्रम सादर केले.सूत्रसंचालन सोकेवाडी शाळेचे युवराज तळपे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button