वासिंद येथील माहूली गडाच्या पायथ्याशी वसलेले कातबाव येथे महापुजा संपन्न

एस. के. जाधव / प्रतिनिधी
शहापूर तालुक्यातील वासिंद येथील माहूली गडाच्या पायथ्याशी वसलेले कातबाव येथे महापुजा संपन्न.
माहुलीच्या तहाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या छोटयाशा पाड्यात गेली ४९ वर्षा पासून चालत आलेली महापूजा संपन्न झाली.
पूर्वी कारव्यांच्या कुडांची असलेली घरे घरकुल योजनांच्या माध्यमातून विटा सिमेंटची पक्की घरे पहावयास मिळतात. येथील लोकांचा जनावरे पालन हा व्यवसाय असून शासनाकडून यांना फलाट म्हणजे शेत जमिनी मिळाल्या आहेत. सर्व आदिवासी गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. कोणताही कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने पार पडत असतो.
अकोले, अंबड येथील शिक्षक ह.भ.प. संपत महाराज भोर यांनी ” विटेवरी ज्याची पाऊले समान” या अभंगावरती नैमितीक किर्तन केले. किर्तनातून त्यांनी पांडूरंगाची भक्ती, संतांचे साहित्य यावर प्रकाश टाकला. संत साहित्यातून मानवी मनावर संस्कार होतात हे पटवून दिले. त्याच बरोबर शहाजी महाराज, शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर यांनी समाजासाठी केलेले कार्याचा मागोवा घेतला.
वारकरी संतांनी भक्ती हा पाचवा पुरुषार्थ आपल्याला उपलब्ध करून दिला .वारकरी संतांची वांग्मय हे अभंग ज्ञानेश्वरी आणि भागवत यात समाविष्ट असून याचा अभ्यास करणे आणि त्याप्रमाणे जीवनात वारकरी संतांची जीवनमूल्य प्रस्थापित करणे हे आपल्या सर्वांपुढे आव्हान आहे. ग्रामस्थांनी यापुढे तीन दिवसाचा सप्ताह करायचे नियोजन करावे अशी सूचना किर्तकार महाराजांनी केली
माहूलीच्या तहाची (शहाजीराजे आणि मुगल यांच्यातील )माहिती करताना महाराजांनी दिली .तसेच या तहाचे दुरगामी परिणाम महाराष्ट्रावर आणि देशावर कसे झाले हे मांडले .
यावेळी श्री सचिन बंगाळ,संत निवृत्तीनाथ ट्रस्ट एकदरे या संस्थेचे सचीव श्री चिंधू मारूती भांगरे, श्रीकृष्ण भजनी मंडळातील श्री सोमनाथ भांगरे, श्री निवृत्ती भांगरे, श्री हरी भांगरे, श्री त्र्यंबक भांगरे,श्री लहानू पोपेरे, श्री भरत पोपेरे, संदिप भांगरे, महादर्पन चे प्रतिनिधी संतु जाधव तसेच ग्रामस्त मंडळ कातबाव उपस्थित होते. सायंकाळी हरिपाठ झाल्यावर स्नेहभोजनाचा व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घेतला.




