आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१४/१२/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण २३ शके १९४७
दिनांक :- १४/१२/२०२५,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५४,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १८:५०,
नक्षत्र :- हस्त समाप्ति ०८:१९,
योग :- सौभाग्य समाप्ति ११:४५,
करण :- बव समाप्ति –:–,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- वृश्चिक – ज्येष्ठा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०७नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:३१ ते ०५:५४ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:३९ ते ११:०२ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ११:०२ ते १२:२४ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:४६ ते ०३:०९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शुक्र पूर्व लोप, अमृत ०८:१९ प., घबाड ०८:०९ प., भद्रा १८:५० प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अग्रहायण २३ शके १९४७
दिनांक = १४/१२/२०२५
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
भविष्याची फार चिंता करू नका. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्या सक्षम बनाल.
वृषभ
आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. चर्चा सकारात्मक असेल.
मिथुन
व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. कमिशन मध्ये लाभ होईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
कर्क
वायफळ बडबड करणार्यांपासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते.
सिंह
आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कन्या
आज दिवस संमिश्र जाईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. अति विचार करणे टाळावे.
तूळ
शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.
वृश्चिक
आज मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका.
धनू
आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.
मकर
आपली क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल. अति स्पष्ट बोलणे टाळावे. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. कामाचा उरक वाढवावा.
कुंभ
जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल.
मीन
आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका. आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



