इतर

कोतुळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करा – देशमुख

कोतुळ प्रतिनिधी

कोतुळेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करा अशी मागणी येथील शिव भक्त व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब देशमुख यांनी केली आहे

श्री क्षेत्र कोतुळेश्वर देवस्थान हे कोतुळ परिसरातील एक जागृत जुने देवस्थान आहे महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे

कोतुळेश्वर देवस्थान कडे जाण्यासाठी शासकीय विश्रामगृहा जवळून तसेच एसटी बस स्थानका जवळून असे दोन रस्ते आहेत हे दोन्हीही रस्ते अतिशय अरुंद असल्याने या मार्गावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते महाशिवरात्रीच्या दिवशी तर भाविकांना मोठ्या गैर सोयीला तोंड द्यावे लागते स्मशान भूमी कडून येणारा रस्ता पिंपळगाव खांड धरणाच्या बॅक वॉटर मध्ये गेल्याने या ठिकाणी संरक्षक भिंत बांधून नव्याने रस्ता करावा तसेच शासकीय विश्रामगृह कडून कोतुळेश्वर मंदिराकडे जाणारा संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरणासह 30 फूट रुंदीचा करावा यामुळे देवस्थानकडे येणाऱ्या भाविकांची वर्दळ आणखी वाढेल हा संपूर्ण रस्ता कॉंक्रीकरणासह तसेच पूर्ण रस्त्याने पथदिव्यांसह विद्युतीकरण करावे अशी मागणी श्री भाऊसाहेब देशमुख यांनी केली आहे

श्री क्षेत्र कोतुळेश्वर मंदिर परिसरात मंगल कार्यालयाचे बांधकाम करावे यामुळे या ठिकाणी गोरगरिबांचे लग्न कार्य पार पडतील अशी सर्व प्रथम मागणी श्री भाऊसाहेब देशमुख यांनी तीन वर्षांपूर्वी केली होती आमदार डॉ किरण लहामटे तसेच कोतुळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष सुरेशराव कोते यांच्या पाठपुरावाने कोतुळेश्वर परिसरात भव्य अशा शिवपार्वती मंगल कार्यालयाचे काम सुरू आहे मंगल कार्यालय चे काम सुरू केल्यास आपण स्वतः पाच हजार रुपये ची देणगी देऊ असे त्यांनी तीन वर्षांपूर्वी जाहीर केले होते मंगल कार्यालयाचे काम सुरू होताच तो शब्द त्यांनी पूर्ण करून त्यांनी रोख स्वरूपात पाच हजार रुपयांची देणगी देवस्थान कडे जमा केली आहे त्यांची ही मागणी आता पूर्णत्वाकडे जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button