इतर

नेप्ती येथे महात्मा फुले जयंती साजरी

महात्मा फुलेंचे विचार दिशादर्शक- प्रा. एकनाथ होले

अहिल्यानगर /प्रतिनिधी:

नगर तालुक्यातील नेप्ती येथील श्री संत सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सावता माळी तरुण मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.

तसेच विनोद कदम यांची महाराष्ट्र पोलीस पुणे येथे निवड झाल्याबद्दल नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते भानुदास फुले, माजी सरपंच अंबादास पुंड , सामाजिक रामदास फुले यांच्या हस्ते विनोद कदम याचा सन्मान करून सत्कार करण्यात आला .सावता महाराज मंदिर परिसरात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवून सावता महाराज मंदिर परिसर स्वच्छ व सुंदर केला. सावता महाराज मंदिरात महात्मा फुले यांच्या प्रतिमेभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे, माजी सरपंच अंबादास पुंड ,माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, प्राध्यापक एकनाथ होले सर, समता परिषदेचे अध्यक्ष शाहूराजे होले, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले व अन्य मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राध्यापक एकनाथ होले सर होते.


“मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” हा संदेश समाजात प्रभावीपणे रुजवा . रुढी व परंपरांनी ग्रासलेल्या समाजात महिलांना मानाचे स्थान नव्हते, “महात्मा फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर ते विचारांचे क्रांतिकारक होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळातही त्यांच्या विचारांची गरज अधिक तीव्रतेने जाणवते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास करून समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा घ्यावी.” महात्मा फुले यांचे विचार आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहेत असे यावेळी प्रा.एकनाथ होले यांनी सांगितले
ते पुढे म्हणाले की “महात्मा फुलेंनी दिलेला समता, बंधुता आणि शिक्षणाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुला-मुलींना शिक्षण देण्यास प्राधान्य द्यावे,” असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमात विविध मान्यवरांची भाषणे झाली.

यावेळी माजी सरपंच संजय जपकर, माजी सरपंच अंबादास पुंड, माजी पंचायत समिती सदस्य किसन देवा होले, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे ,प्राध्यापक एकनाथ होले सर ,सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले , समता परिषदेचे अध्यक्ष शाहूराजे होले , मिलिंद होले ,प्राध्यापक भाऊसाहेब पुंड ,माजी सरपंच दिलीप होळकर,माजी उपसरपंच शिवाजी होळकर, जालिंदर शिंदे, भानुदास फुले, ग्रामपंचायत सदस्य सोमानाथ पुंड, दत्तात्रय कदम, सबाजी कांडेकर, किसन कांडेकर, सोसायटी चेअरमन विलास जपकर, आकाश महाराज फुले, राजाराम जपकर, कानिफ कळमकर ,दिनेश भोळकर ,उमर सय्यद, सागर शिंदे, सौरभ भूजबळ , सामाजिक कार्यकर्ते जमीर सय्यद, अनिल पवार, नानाभाऊ इंगोले, पोलीस पाटील अरुण होले, संदिप फूले ,कार्तीक कळमकर, विनोद कदम ,ओंकार चौरे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button