श्री केदारेश्वर विद्यालय, बाभुळवाडे येथे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

पारनेर प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त श्री केदारेश्वर विद्यालय, बाभुळवाडे येथे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. कै. मुकुंदराव गुंजाळ यांच्या स्मरणार्थ तीन लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या भव्य सभामंडपाचा लोकार्पण सोहळा शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.
सभामंडपाचे लोकार्पण मा. हरिश्चंद्र भाऊसाहेब पोटे, डॉ. नानाभाऊ यशवंत खणकर, श्री. योगेश दगडू पोटे, श्री. सुभाष लक्ष्मण ठुबे सर आणि देणगीदार श्री. हेमंतकुमार मुकुंदराव गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या विकासासाठी श्री. लक्ष्मण हिरोजी गाजरे यांनी २५ हजार रुपये, डॉ. नानाभाऊ यशवंत खणकर यांनी २५ हजार रुपये, मा. हरिश्चंद्र पोटे यांनी १५ हजार रुपये, श्री. योगेश पोटे यांनी १५ हजार रुपये, कार्यकारी सेवा सोसायटी, बाभुळवाडे यांनी ११ हजार रुपये आणि केदारेश्वर देवस्थान सेवाभावी ट्रस्टने ११ हजार रुपये, तसेच सुलभा पानमंद, वैशाली कापसे, भिकाजी जगदाळे सर, दत्तात्रय लोंढे सर, राहुल जगदाळे व रविशंकर मोरे सर यांनी प्रत्येकी ५ हजार रुपयांची देणगी दिली.

तसेच विद्यालयाच्या प्रार्थना मैदानावर महाशिवरात्रीपूर्वी देणगीच्या माध्यमातून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचा संकल्प ग्रामस्थ व दानशूर मंडळींनी जाहीर केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील निवृत्त मंडलाधिकारी मा. हरिश्चंद्र भाऊसाहेब पोटे होते. प्रमुख वक्ते मा. सुभाष लक्ष्मण ठुबे यांच्यासह रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे संस्थापक सदस्य, माजी रयत सेवक, शिक्षक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. संजय भगवंत नवले सर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. संतोष शंकर जाधव यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षणविषयक विचारांना अभिवादन करत विद्यालयाच्या विकासासाठी दानशूर व्यक्तींनी दिलेले योगदान प्रेरणादायी ठरले.



