इतर
नगरसेवक राजू ठाकूर यांच्या पुढाकाराने देऊळवाडी गावात रावबिली स्वछता मोहीम!

हेमंत देशमुख
उरण दि 01
सार्वजनिक गणेशत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक राजू ठाकूर यांच्या पुढाकाराने देऊळवाडी गावात स्वछता मोहीम राबविण्यात आली
उरण तालुक्यातील देऊळवाडी गाव गणपती उत्सवासाठी चकाचक साफ करण्यात आले देऊळवाडी गावातील नगरसेवक राजू ठाकुर यांनी याकामी पुढाकार घेतला समाजसेवक रोहित नितीन पाटील, देऊळवाडी युवक मंडळ अध्यक्ष निरंजन अशोक नार्वेकर, उपाध्यक्ष प्रसाद म्हात्रे, तसेच देऊळवाडी युवक मंडळ चे सर्व पदाधिकारी, तसेच देऊळवाडी ग्रामस्थ मंडळ चे पदाधीकारी यांनी अथक परिश्रम घेतले आणि देऊळवाडी परिसर चकाचक साफ करण्यात आला सणासुदीच्या दिवसांत परिसर चकाचक साफ करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले