राजूर ला राणी दुर्गावती जयंती निमित्त महिला स्नेह मेळावा संपन्न

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
राजूर येथे सहयाद्री आदिवासी कोळी महादेव जमात संस्था महाराष्ट्र राज्य आयोजित राणी दुर्गावती जयंती साजरी झाली
या निमित्त महिला स्नेह मेळावा व सभासद संपर्क अभियान मोठ्या उत्साहात पार पडले या संस्थेच्या विश्वस्त व अकोले तालुका सभासद बंधू -भगिनींच्या उपस्थित उत्साहात पार पडला .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्य अध्यक्षा- भारतीताई उंडे यांनी भूषविले .उपाध्यक्षा . मंदाताई कचरे,खजिनदार – मिनाताई कोंडार – संदस्यां . रंजनाताई हिले, .कमलताई डगळे , . सुरेखाताई बोऱ्हाडे यांच्या हस्ते आदयक्रांतिवीर भूमीपूत्र राघोजी भांगरे व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेस पूष्पहार , पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली .
राजूरकर भगिनींच्या वतीने राज्यपदाधिकारी बांधवांचे स्वागत करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित प्रमूख पाहूणे राज्यपदाधिकारी यांच्याकडून संघटनेचे उद्देश , दिशा व गरज यावर विचार मांडण्यात आले . उपस्थित अकोलेकर सभासद / बंधू -भगिनींनी संघटनेसाठी कार्य करण्याची तयारी दाखवली .

यावेळी संघटक पदासाठी नियुक्ती पत्रके देवून तालुका व जिल्हा कार्यकारणी व संघटना वाढीसाठी जबाबदारी निश्चित केली .
राज्य संघटक-श्री . प्रल्हाद कोंडार , श्री . संजय गोडे , श्री . अर्जुन तळपाडे
*जिल्हा संघटक-सौ . प्रमिला अर्जुन तळपाडे , सौ . सविता श्रीकांत ठोंगिरे , सौ . वनिता प्रल्हाद कोंडार , सौ . सुवर्णा अनिल भांगरे
*तालुका संघटक-सौ . वनिता संतोष कोंडार , सौ . सोनाली नारायण कोंडार , सौ . सुनिता भागवत भांगरे , सौ . रोहिणी बाळासाहेब मेचकर , सौ .निर्मला काशिनाथ मांगे , सौ .जोत्स्ना सोमनाथ साबळे , सौ . अनिता सुनिल मेचकर, श्री . मनोहर रामचंद्र भांगरे याप्रमाणे संघटनेसाठी जबाबदारी निश्चित करून राज्य , जिल्हा व तालुका कार्यकारणी निर्मितीसाठी सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले . मा संजय गोडे सर यांना आदिवासी कोळी महादेव जमात सर्वेक्षण राज्यप्रमूख पदी नियुक्ती करून
संघटनेचे नियुक्ती पत्रक देण्यात आले .
कार्यक्रमासाठी सौ .लता दिनकर बांडे , सौ . अपर्णा संतोष कोंडार, सौ . दिपाली बाळू इरनक , सौ . रत्नमाला देवराम धांडे , सौ . सोनाली दत्ता पटेकर , सौ . मंदा धोंडीबा डगळे , सौ . रंजना सखाराम सुकटे , सौ . रंजना गुलाबराव धिंदळे , सौ . अलका अशोक भांगरे आदि बंधू -भगिनीं मोठया संख्येने उपस्थित होते . उपस्थित सर्व भगिनींना राज्यपदाधिकारी यांच्याकडून भेटवस्तू देण्यात आल्या .एकंदरीत संघटनेच्या भावी वाटचालीसाठी राजूर प्रांतातून आजचा कार्यक्रम दिशादर्शक राहील असा विश्वास व्यक्त केला.



