इतर

व्यसनमुक्तीस जन आंदोलनाचे स्वरूप द्यावे…ब्रह्माकुमारी साधना दिदी

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात नशा मुक्त भारत अभियानाची प्रतिज्ञा

दत्ता ठुबे /पारनेर दि.23
व्यसनमुक्त भारत बनवण्यासाठी फक्त अभियान राबवून चालणार नाही तर त्यात जन आंदोलनाचे स्वरूप निर्माण झाले पाहिजे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे साधना दिदी यांनी केले.
पारनेर शहरातील ईश्वरीय विश्व विद्यालय येथील केंद्रात नशा मुक्तभारत अभियान अंतर्गत विषय मार्गदर्शन करताना साधना दिदी यांनी सांगितले की, आज वर्तमान समया नुसार संपूर्ण विश्वामध्ये ताण तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक व्यक्ती टेन्शन घालवण्या साठी अमली पदार्थांचे आहारी गेला आहे. असा गैरसमज झाला आहे की अमली पदार्थांचे सेवन केले की ताण तणाव कमी होईल. परंतु असे नाही तर थोड्या वेळा साठी दुःखाचा विसर पडेल पण परिस्थिती बदलणार नाही. मग का आपण नशा करून आपले शरीर रोगी बनवायचे. कॅन्सर सारख्या रोगांवर लाखो रुपये खर्च होतात. तरीही आजार बरे होत नाही. दारू पिऊन लिव्हर खराब होतो. बिडी सिगारेट व्यसनाने फुफ्फुस खराब होत आहे. म्हणून भारत सरकारने मेडिकल विंग यांच्या अध्यक्षतेखाली नशा मुक्त भारत अभियान राबविले जात आहे. या पार्श्वभूमीवर ईश्वरीय विश्व विद्यालयात ईश्वरीय परिवाराने नशा मुक्तीची प्रतिज्ञा ग्रहण केली.
सूत्रसंचालन राम भाई यांनी केले तर आभार ईश्वरीय परिवाराने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button