इतर

आदिवासी समाजाने व्यसने आणि अंध श्रद्धेपासून दूर राहावे – डॉ श्रीपाल सबनीस .


विलास तुपे /राजूर प्रतिनिधी

येथे आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र , पुणे व स्वप्नदूत फाउंडेशन , मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार ॲड देशमुख महाविद्यालय राजूर येथे आयोजित करण्यात आला .
या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ श्रीपाल सबनीस बोलत होते .
आदिवासी समाज हा जगातील सर्वात जुना आहे , त्यांना मूळ निवासी म्हणूनही संबोधले जाते . ते फक्त जल , जमीन आणि जंगलांवर अवलंबून आहेत . हा समाज साधाभोळा , लाजरा – बुजरा ,तथापि खूप सहनशील आणि तेव्हढाच प्रामाणिक आहे . आजच्या काळातील पुढारलेल्या समाजाने आदिवासी समाजा कडून आदर्श घेण्याची गरज आहे . आज आदिवासी समाज कितीही गरीब असला तरी कर्ज काढीत नाही , आत्महत्या करीत नाही , हुंडा प्रथा नाही .भीक मागत नाही
तथापि आजची तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून अंधश्रद्धा सुद्धा फोफावत आहे , या पासून आदिवासी समाजाने दूर राहण्याची गरज आहे . आदिवासी समाजाला सांस्कृतिक वारसा असून तो त्यांना जपायला हवा . भगवान बिरसा मुंडा , राघोजी भांगरे , बाबुराव शेडमाके , राणी दुर्गावती आदी क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरोधी प्रखर लढा दिला आहे , ते खरे आद्यक्रांतिकारक आहेत , परंतु त्यांची इतिहासाने नोंद घेतली नाही . तरुण पिढीने या सर्वांचा आदर्श घेऊन आपलं भावी आयुष्य सुखी करून पुन्हा समाजाकडे वळावे अशा शुभेच्छा दिल्या .


मा दिनकरजी पावरा , अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी आपल्या जीवनात प्राथमिक शाळे पासून ते उच्च शिक्षणा पर्यंतचा प्रवास उलगडला .अत्यंत गरीब परिस्थिती आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे हुशारी असूनही योग्य संधी मिळाली नाही . तथापि अत्यंत चिवटपणा , कितीही कष्ट करण्याची जिद्द असल्यास कोणत्याही शाखेत प्रवेश मिळाला तरी संधीच सोनं करता येत . स्पर्धा परीक्षेची तयारीदहावी पासूनच चालू केली होती .
पद्बश्री / बीजमता सौ राहीबाई पोपेरे यांनी यांनीही आपल्या जीवनाचा पट उघडून सांगितला त्याचे कारण या कार्यक्रमास अधिक प्रमाणात मुली व महिलांचा भरणा अधिक होता . मी एक अडाणी , अक्षर ओळख नसणारी बाई बाईफ संस्थेच्या सहकार्याने माझं नाव जगभर नेलं . माझं काम तर आयुष्यभर भर चालूच होत . अतिशय गरिबी असतानाही मी गरिबीचा कधी बाऊ केला नाहीमी गरिबीमुळे अधिक शिकले . देशी वाणांचा महत्व विशद करून आजच्या हायब्रीड दूध , बियाणे यामुळे मनुष्याचं आयुष्य कमी तर होतंच आहे परंतु मोठ्या प्रमाणात रोगांचं प्रमाण वाढलं असून डॉक्टरांची दुकान वाढली आहेत .शेतकऱ्यांनि शेतात शेण खत आणि गांडूळ खत वापरून धान्याचं चांगलं पीक घेता येईल आणि शेतीचा रासायनिक औषधे आणि खतांच्या भडीमार वापराने निकृष्ट झालेली जामीनही सुधारता येईल दुर्दैवाने खूप शिकलेली माणसं मूग गिळून का बसली आहेत , याच कोड सापडत नसल्याचे भावनिक उद्गार काढले .
या कार्यक्रमात अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ भाऊसाहेब देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .प्राचार्य यांनी राजूर मध्ये ” आदिवासी संस्कृती आणि संवर्धन ” करणेसाठी एखादे संग्रहालय उभारण्याचे साकडे आमदार साहेब आणि अप्पर आयुक्त मा पावरा साहेब यांना साकडे घातले .
आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष इंजि नामदेव गंभिरे यांनी संस्थेच्या कार्याचा 37 वर्षाचा आढावा घेताना शिक्षण आणि बोगस जातींचा समाचार घेऊन बोगस जातींना मुळा सकट काढून टाकले नाही तर पुढील काही वर्षात आदिवासी संस्कृती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली . स्वप्नदूत फाउंडेशनचे अध्यक्ष इंजि सुनिल भांगरे यांनी या संस्थेचा आढावा घेऊन पुढील ध्येय धोरणे नमूद करुंन पद्मश्रि सौ राहीबाई पोपेरे यांना देण्यात आलेल्या मानपत्राचं वाचन केलं . या कार्यक्रमात सुमारे 110 विद्यार्थ्यांना ट्रॉफी , डॉ गोविंद गारे यांचं पुस्तक आणि रोख रकमेचं वाटप करण्यात आले .सौ सुरेखा कुलाळ यांच्या आदिवासी संस्कृतीवर गायिलेल्या गाण्यानं तुडूंब भरलेलं सभागृह प्रफुल्लीत झालं .


या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी सुदाम चपटे ,लक्ष्मण भालेकर ,प्रशांत शिंगाडे , दुदा मोरे ,सतीश लेंभे ,डॉ प्रदीप आंबवणे , चिंतामण भुरकुंडे ,दिनकर शेळकांदे ,गोविंद जंगले ,दुदा किरवे ,राजेंद्र रेंगडे ,ज्ञानदेव बुरुड ,संजय केदारी ,गंगाराम शेखरे ,बाळासाहेब रेंगडे ,त्याच प्रमाणे स्वप्नदूत चे दिपक गंभिरे ,सागर गंभिरे , विकास गंभिरे ,सचिन भांगरे ,ऋतुजा गंभिरे ,डॉ चंद्रकांत लहामटे ,अनिता गोडे ,अशोक भवारी ,ज्ञानेश्वर घाटकर ,प्रवीण घिगे ,किसन पडवळे ,विठ्ठल गंभिरे ,प्रणिता गोडे , निकिता गोडे ,सोनाली भवारी , योगिता बांबळे ,छाया सातवं ,अमृता भांगरे ,अनिता लोहकरे ,सुनीता गंभिरे ,कांचन ईदे ,नीता गोडे ,मेंढी सर ,किशोर लोहकरे ,दर्शना लहामटे ,निशा गंभिरे यांनी विशेष सहकार्य केले , त्याच प्रमाणे अकोले कृती समितीचे रमेश हिले , शिवराम भांडकोळी यांनीही उपस्थिती लावली .
गंगाराम सांगाडे आणि विकास गंभिरे यांनी सूत्र संचालन केले , किसन भोजने यांनी विद्यार्थी सत्कार वाचन केले , , तर खेवजी भोईर यांनी आभार प्रदर्शन केले . .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button