इतर

आदिवासी समाजाचा इतिहास गौरवशाली व पराक्रमी…!आदिनाथ सुतार


अकोले -अहिल्यानगर जिल्ह्य़ातील आदिवासी समाजाचा इतिहास गौरवशाली व पराक्रमी आहे.हा इतिहास केवळ युद्धाचा इतिहास नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा,जल, जमीन, आणि जंगल यांच्या अस्तित्वासाठीच्या संघर्षाचा इतिहास आहे.असे प्रतिपादन
धरती आबा भगवान बिरसा मुडा यांची एकशे पन्नासावी जयंती महोत्सव निमित्त अनुदानित आश्रम शाळा पिंपळदरी ता.अकोले येथे आज गुरुवार दि.28/08/2025 रोजी आयोजित “अहिल्यानगर जिल्ह्य़ातील क्रांतिकारकांचा इतिहास” या विषयावर पिंपळदरी शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय मालव यांचे अध्यक्षतेखाली व रामनाथ कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या व्याख्यान कार्यक्रमात प्रमुख व्याख्येत म्हणून श्री.आदिनाथ सुतार हे बोलत होते. श्री.सुतार आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की,
गोविंद खाडेंच्या पराक्रमांनी पावन झालेला रतनगड, रामजी भांगरे,राया ठाकुर, बाळु पिचड, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे,पिरजादे मामलेदाराचा वध करणारे कोंडाजी नवले,बापु भांगरे,खंडुजी साबळे,धर्मा भांगरे,गोपाळ भांगरे,सक्रु बुधा मेंगाळ,यांनी भुमिगताच्या चळवळी कशा चालवल्या.पोवाडे व लोककथामधुन ब्रिटिशांविरुद्ध लोकभावना निर्माण करणारे देवजी आव्हाड, राया ठाकर, धर्मा मुंढे,भागोजी घिगे,रामा बांबळे,धर्मा मधे,किस्ना गोडे,यांनी समाज जागृत केला.ब्रिटिशांनी आदिवासींचा वनसंपत्तीवरचा अधिकार काढून घेतला, नवीन कर लादले आणि आदिवासींची पारंपारिक जीवनशैली बाधित केली. या अन्यायाविरुद्ध राघोजी भांगरें यांनी आवाज उठवला.


त्यांनी कोळी, भिल्ल, महादेव कोळी ,ठाकर अशा अनेक आदिवासी जमातींना एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने ब्रिटिशांच्या छावण्यांवर आणि सरकारी कार्यालयांवर हल्ले केले. त्यांनी ब्रिटिश सैनिकांना अनेक ठिकाणी पराभूत केले.
राघोजीच्या बंडाने ज्या मुल्यांचा उदात्त पणे पुरस्कार केला ते शोषण मुक्तीचे, जातपात मुक्तीचे,स्त्री सन्मानाचे, अन्यायाविरोधात झगडण्याचे, स्वाभिमानाचे,स्वायत्ततेचे,
स्वराज्याचे मुल्य,येथील मातीत कायमचे रूजले.
राघोजी भांगरे, राया , ठाकर हे इतिहास घडवणारी माणसे होते ते जरी काळाच्या पडद्याआड विसावले असले तरी त्यांनी आपल्या विचाराप्रती दाखवलेली निष्ठा सोसलेले हाल अपेष्टा याला तोड नाही. त्यांचे कर्तुत्व ,पराक्रम नव्या पिढीसमोर येणे गरजेचे आहे असे प्रतिपादन श्री.सुतार यांनी शेवटी केले.
कार्यक्रमासाठी राधेश्याम जगधने ,मंदा घुले, संगीता आंबरे, भाऊसाहेब राऊत, शंकर कडाळे, उन्नती वाघ, शितल गिरी,भटु नागमल, अशोक कोरके ,योगेश येवले ,सुनिल डोळस ,छाया ठोकळ,प्रमोद कोल्हे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील शेळके यांनी केले तर शेवटी आभार विठ्ठल चौधरी यांनी मानले.कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थही उपस्थिती होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button