आरएमबी च्या अध्यक्षपदी अमित पगारे ह्यांची फेरनिवड

नाशिक – रोटरी मिन्स बिज़नेस (आरएमबी) च्या अध्यक्षपदी अमित पगारे ह्यांची फेरनिवड करण्यात आली.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या रोटरी इंटरनॅशनल ची आरएमबी ही संघटना आहे.
रोटरी क्लब चे सभासद असलेले उद्योजक ,व्यावसायिक ह्यांच्या साठी औद्योगिक भेटी,,चर्चासत्र,प्रशिक्षण आणि विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.
डिस्ट्रिक्ट चेयरमैन डॉ गौरव सामनेरकर ह्यांच्या निवड समितीने अमित पगारे व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाल्याची माहिती दिली. अमित पगारे हे रोटरी क्लब ऑफ नाशिक चे मेंबरशिप डायरेक्टर आहेत तसेच अपेक्स कम्प्युटर्सचे संचालक आहेत. ह्यात ते संगणक, लॅपटॉप, प्रिंटर आणि इलेक्ट्रॉनिक विक्रीच्या व्यवसायात आहेत.
विविध प्रदर्शन, उपक्रम,अभ्यास दौरे.चर्चासत्र ह्यांचे वर्षभरात आयोजन करण्यात येणार असल्याचे अमित पगारे ह्यांनी सांगितले .



