ठाणे पोलिसांकडून गुटख्याच्या विरुध्द धडक कारवाई १५, लाखा चा गुटखा जप्त, ०२ आरोपीना अटक

–00000—
“ठाणे /प्रतिनिधी
भिवंडी, पडघा, गणेशपुरी पोलीस ठाणेचे हद्दीत ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धडक कारवाई करत 15 लाखाचा गुटखा पकडला आहे
मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. डी. एस. स्वामी तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. अनमोल मित्तल, यांचेकडुन ठाणे ग्रामीण पोलीस दलाच्या कार्यक्षेत्रात अवैध धंद्दयाविरुध्द प्रभावीपणे कारवाई करणेबाबत आदेश देण्यात आले असतांना, श्री. सुरेश मनोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी जिल्हयात अवैध धंदयाबाबत गोपनीय माहिती मिळवून कारवाई करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे वेग-वेगळे पथक तयार करुन त्यांना मार्गदर्शन केले.
सदर पथकाकडून भिवंडी, पडघा, गणेशपुरी पोलीस ठाणेचे हद्दीत सर्वत्र गस्त करून अवैध धंदयाची गोपनीय माहिती काढण्यात दिनांक १७/०९/२०२५ रोजी रात्रौ ०१.०० वाजताच्या दरम्यान पोहवा / २७६ हनुमान गायकर यांना त्यांचे गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, नाशिक बाजुकडुन एक बुलेरो पिकअप टेम्पो क्र. MH-04-LQ-4791 यांचेत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा हा माल भरुन मुंबई बाजुकडे जात आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिवंडी तालुका पोलिस ठाणे हदीमध्ये मुंबई-नाशिक हायवेरोडवरील वडपे नाक्या जवळ ता. भिवंडी जिल्हा ठाणे येथे बातमीदार यांनी सांगितले प्रमाणे गस्त करुन उभे असतांना रात्रौ ०१.४५ वाजताच्या दरमान सदर ठिकाणी बुलेरो पिकअप टेम्पो क्र. MH-04-LQ-4791 आडवुन सदर पिकअप टेम्पोची दोन पंचासमक्ष झडती घेतली
त्यामध्ये रजनिगंधा पान मसाला, विमल पानमसाला, व्हि – १ तंबाखु असा मानवी आरोग्यास अपायकारक व महाराष्ट्र शासनाने तंबाखुजन्य गुटखा व पिकअप टेम्पोसह एकुण १५,०५,०८०/- रुपये किंमतीचा माल मिळुन आला.

सदर कारवाईमध्ये बुलेरो पिकअप टेम्पो क्रमांक MH-04-LQ-4791 मधील वर नमुद किंमतीच्या मुद्देमाल टेम्पोसह सह गुन्हयाचे पुढील तपासकामी जप्त करण्यात आले तसेच त्यावरील चालक नामे १) चालक नामे- शिवाजी रामकिशन गुप्ता वय-२६ वर्षे सध्या रा. नवसाईधाम, रुम नं. ०४, एस. व्ही. रोड, भाईदर पुर्व जि. ठाणे २) किन्नर – शशीकांत श्रीमुनी गुप्ता वय- २० वर्षे, रा. ओमशांती चौक, रामग्रंथ पॅलेस, रुम नं.००१, भाईदर पूर्व जि.ठाणे यांना ताब्यात घेवुन पोना / २०१२ योगेश
महादु शेळकंदे, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी दिलेल्या तक्रार वरून भिवंडी तालुका पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्र.ळा ४२५/२०२५, भारतीय न्याय सहींता कलम १२३, २७४, २७५, २२३, ३ (५) सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ३ (१) (झेड) (झेड) (आय), २६ (२) (आय) (४), २७ (१), ३० (२) (ए) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास भिवंडी तालुका पोलीस ठाणचे पोलीस उप निरीक्षक/वाकचौरे मो. क्र. ८९२८०५३५४९ हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. श्री. डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, तसेच मा. श्री. अनमोल मित्तल, अपर पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांनी दिलेल्या आदेशपर सुचनेप्रमाणे श्री. सुरेश मनोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा ठाणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि / दिपेश किणी, पोहवा / १५४२ उमेश पांडुरंग ठाकरे, पोहवा / २७६ हनुमान बंधु गायकर, पोना / ३०१२ योगेश महादु शेळकंदे, पोना / १७२१ जितेंद्र दिनकर वारके, पोशि/ ३१३७ जयेश मुकादम या पथकाने कौशल्यपुर्ण उल्लेखनिय कामगिरी केली आहे.
=============
या ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇
https://chat.whatsapp.com/HZjJVC5cIlDADUHMJwV712?mode=ems_copy_t


