इतर

आंदोलनाचा इशारा देताच मवेशी शासकीय आश्रम शाळेला शिक्षक मिळाले

अकोले प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील मवेशी येथील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थ्यांची शाळेतील गैरसुविधांमुळे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत वरिष्ठांनी वेळीच दखल न घेतल्यासआरपी आय चे नेते विजयराव वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन छेडण्याचा इशारा आर पी आय चे अकोले तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी दिला होता याची दखल घेत प्रशासनाने शाळेला तात्काळ गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक दिले आहे

अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मवेशी येथे इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शैक्षणिक वर्ष सुरू होऊन अनेक दिवस झाले असले तरी शाळेत विद्यार्थ्यांना
गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्यासाठी शिक्षक च नसल्याची बाब लक्षात आल्या नंतर आर पी आय चे युवक अध्यक्ष विजय पवार यांनी उपलब्ध नाहीत जर गणित आणि विज्ञान यांचा अभ्यास शिकवण्यासाठी शिक्षक नसतील तर विद्यार्थी काय शिक्षण घेणार हा विद्यार्थ्यांवर केलेला शैक्षणिक अन्याय आहे
शासन आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यम शिक्षण देण्यासाठी मोठा आटापिटा करत असले तरी या शाळेत मात्र शिक्षकच नसणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे

, आदर्श इंग्लिश मिडीयम आश्रमशाळेत गणित आणि विज्ञान यांच्या साठी शिक्षक नाहीत,? साफसफाई करण्यासाठी सफाई कामगार नाहीत? आश्रमशाळेत जागेवर जेवण बनवने आवश्यक आहे मात्र

नाशिक जिल्हा इगतपुरी तालुक्यातील मुंडे गावातील सेंट्रल किचन येथुन जेवण (अन्न) बनवून आणले जाते, सेंट्रल किचन मुंडे गावावरून विद्यार्थ्यांना जेवण येते ते निकृष्ट दर्जाचे असते त्या जेवणात आळ्या (किडे) असतात यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो या शिवाय विष बाधे सारखे प्रकार होऊ शकतात मात्र या कडे राजूर प्रकल्प कार्याल्याचे दुर्लक्ष आहे

सरकारने तात्काळ तातडीने लक्ष देऊन विद्यार्थांना गणित आणि विज्ञान यांचे शिक्षक सुविधा करून नेमवनूक करावी तसेच आश्रम शाळेत साफ सफाई करण्यासाठी भरती करण्यात यावी आणि नाशिक जिल्ह्या मधील मुंडे गाव सेंट्रल किचन येथुन येणारे जेवण बंद करण्यात यावे आश्रम शाळेत जेवण बनवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी,
जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्य जीवनावर होणारा परिणाम थांबले तसेच तसेच आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन प्रथमोपचार करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी ची नेमणूक करावी अन्यथा आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर प्रकल्प कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा युवक तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button