इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि ०१/१०/२०२५,

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०९ शके १९४७
दिनांक :- ०१/१०/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१७,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति १९:०२,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति ०८:०६,
योग :- अतिगंड समाप्ति २४:३४,
करण :- बालव समाप्ति ०६:४०,
चंद्र राशि :- धनु,(१४:२७नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – हस्त,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:१९ ते ०१:४८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:२१ ते ०७:५० पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२० पर्यंत,
लाभ मुहूर्त — सकाळी १०:४९ ते १२:१९ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:४७ ते ०६:१७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
एकरात्रोत्थापन व पारणा, महानवमी, नवमी उपवास, बलिदान, आयुध पूजन, मन्वादि, सरस्वती बलिदान
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- अश्विन ०९ शके १९४७
दिनांक = ०१/१०/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ
स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.

मिथुन
कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. भविष्याचा विचार करून योजना आखा.

कर्क
घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा. दिवस मनाजोगा घालवाल.

सिंह
कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.

कन्या
मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.

तूळ
वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.

वृश्चिक
आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.

धनू
आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.

मकर
जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जबाबदार्‍या वाढतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

कुंभ
तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.

मीन
गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button