समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत वाकी येथे ग्रामविकास समितीचे एकदिवसीय प्रशिक्षण

एस. के. जाधव
कोकणवाडी (ता. अकोले ) प्रतिनिधी
दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी, ए.एस.के. फाऊंडेशन, मुंबई पुरस्कृत आणि बायफ (BISLD), नाशिक संचलित समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत वाकी येथे ग्रामविकास समितीचे एकदिवसीय प्रशिक्षण संम्पन्न झाले
या प्रशिक्षणासाठी गुहिरे, रणद बुद्रुक, रणद खुर्द, भंडारदरा, वाकी आणि कोलटेंभे या सहा गावांतील ग्रामविकास समित्यांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य उपस्थित राहिले. समिती पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रशिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
बायफचे श्री. महेश लांडगे यांनी ग्रामविकास समितीच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करून सांगितले की, गावच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार कामांची अंमलबजावणी करणे, विकासकामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून ती कामे गतिमान करणे, सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे ही समितीची प्रमुख कर्तव्ये आहेत. तसेच गावातील समस्यांचा अग्रक्रम निश्चित करून त्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, विविध शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वय साधून विकासकामे राबवणे, पाण्याचा ताळेबंद तयार करणे या बाबींवर त्यांनी मार्गदर्शन केले.

व बायफ चे श्री राम कोतवाल यांनी ग्रामविकास समितीच्या प्रशासकीय कामकाजावर भर दिला. त्यांनी रेकॉर्ड-मीटिंग, इतिवृत्त अहवाल लेखन, लाभार्थी निवड निकष, गाव विकास आराखडा शासन-निमशासकीय यंत्रणांकडे सादर करणे, कामांचा नियमित आढावा घेणे, पारदर्शक नियोजन करणे आणि गावातील सर्व घटकांना माहिती उपलब्ध करून देणे याबाबत सविस्तर माहिती दिली.
तसेच ए.एस.के. फाऊंडेशनचे मॅनेजर श्री. अरुण बांबळे यांनी आदर्श ग्राम निर्मितीसाठी समित्यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांनी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली.
तसेच समितीतील सदस्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवण्यात आली.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन ए.एस.के. फाऊंडेशनचे श्री. सिद्धार्थ अय्यर आणि बायफचे श्री. सुरेश सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. योगेश नवले यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. विष्णु चोखंडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मारुती सगभोर, काजल देशमुख, नयना सगभोर व तारकराम रेड्डी यांनी विशेष परिश्रम घेतले


