स्व.अशोकराव भांगरे यांचे स्वप्नपूर्तीसाठी अमित दादा भांगरे यांना आमदार करा, एकदरा ग्रामस्थांचे मोखाजी बाबाला साकडे!

एस के जाधव
कोकणवाडी ता अकोले दि. 6
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते अमितदादा अशोकराव भांगरे यांचा वाढदिवस एकदरे येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्व. अशोकराव भांगरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून खचून न जाता नव्या उमेदीने कार्य करणारे अमितदादा व समाजाशी असलेली बांधीलकी व एकनिष्टेने जपलेले नाते या कार्यक्रमातून दिसून आले. मोखाजी बाबा मंदिर सभामंडपात सदर कार्यक्रम सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित पार पडला.
अमितदादा भांगरे यांचा गेल्या विधान सभेमध्ये थोड्याशा मताचे फरकाने पराभव झाला, तरी खचून न जाता नव्या उमेदीने नव्या ताकतीने काम कसे करावे ? लोकांच्या समस्या कशा सोडवाव्यात ? या संदर्भात कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून आधार दिला.
हा कार्यक्रम फक्त वाढदिवसाचा केक कापून संपत नाही तर येत्या काळात तुम्ही आमदार झालेच पाहिजेत असे साकडे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मोखाजी बाबांना घातले.

यावेळी भवारी हेल्पनेस्ट फाउंडेशन च्या वतीने भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. त्यामध्ये अनेक बेरोजगार तरुणांनी आपली नावे नोंदवून उस्फूर्त प्रतिसाद दिला. 131 पैकी 22 उमेदवारांची वेगवेगळ्या क्षेत्रात निवड ही झाली. “नोकरी, व्यवसाय करून आपला समाज मोठा झाला पाहिजे, समाजाची उन्नती झाली पाहिजे. तेव्हाच ही तरुण पिढी चुकीच्या मार्गाला जाणार नाही व्यसनाच्या अधीन होणार नाही याची प्रचिती तरुण आणि ग्रामस्थांना आली “. हे स्वर्गीय अशोकराव भांगरे यांचे समाजास बद्दलचे असलेले स्वप्न अमितदादा पूर्ण करतायेत हे बघून सर्वांना आनंद झाला. समाजातील बेरोजगार तरुणांना हाताला काम कसे देता येईल त्या दृष्टीने या वाढदिवसाच्या निमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला.
यावेळी अमितदादांनी आपल्या मनोगतातून बेरोजगारी, अतिवृष्टी,आरक्षण, देवगाव येथील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्या संदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी मोखाजी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष श्री विठ्ठल भांगरे,कार्याध्यक्ष श्री सुनील भांगरे, श्री संजय भांगरे, श्री कुंडलिक (नाना) भांगरे, श्री नंदू भांगरे, श्री दत्तू भंगरे, श्री मोखाजी बाबा ट्रस्टचे सचिव आणि संत निवृत्तीनाथ ट्रस्टचे खजिनदार चिंधू मारुती भांगरे, महादर्पणचे प्रतिनिधी श्री संतु जाधव,इंजिनीयर पांडुरंग लेंडे,सुनील लोखंडे, वाकीचे सरपंच धीरेन सगभोर, खिरवीरेचे सरपंच श्री गणपत डगळे, श्री कुशाबा धांडे,श्री बबनराव सदगीर, श्री राम एखंडे, श्री हेमंत डगळे, श्री विजू आवारी, श्री आण्णासाहेब एखंडे, श्री बाळासाहेब केदार,श्री स्वप्नील धांडे, श्री पोपट चौधरी, श्री सुनील पानसरे व परिसरातील कार्यकर्ते,तरुण,गावकरी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री सुनील तुकाराम भांगरे यांनी केले तर कुंडलिक भांगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
———–



