अकोल्यात शिक्षकांचे तीन दिवशीय मूल्यवर्धन प्रशिक्षण पूर्ण.

एस.के. जाधव / प्रतिनिधी
.अकोले दि. ६
मॉर्डन हायस्कूल अकोले येथे सुरु असलेल्या तीन दिवशीय शिक्षक मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा यशस्वी समारोप झाला.
अकोले पंचायत समितीच्या वतीने मॉर्डन हायस्कूल अकोले येथे सुरू असलेल्या तीन दिवशीय मूल्यवर्धन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप खेळीमेळीचे वातावरणात पार पडला. दिनांक 3 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या या प्रशिक्षणात एकूण 275 शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी श्री अरविंद कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या प्रशिक्षणाचे निरीक्षक श्री संभाजी झावरे ( शिक्षण विस्तार अधिकारी ) यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले की , ” शाळेतील कोपरे हे सामान मुक्त झाले पाहिजेत, दुसऱ्याच्या जागी आपण आहोत ही भावना हृदयात ठेवली पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे, खोटे बोलू नये या ऐवजी ” नेहमी खरे बोलावे ” असे लिहिले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा तसेच वर्तनामध्ये बदल होऊन सर्व मूल्य रुजली पाहिजेत, विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण द्यावे, व्यसनाधीनते पासून, मोबाईलच्या अतिवापरापासून विद्यार्थी दूर राहिला पाहिजे, त्याच्यात सामाजिकता, संस्कार निर्माण होण्यासाठी वर्गात पॉझिटिव्ह संदेश लिहावा. हे सारे अध्ययन – अध्यापनातून घडले पाहिजे “. याबरोबर प्रशिक्षणाच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती दिली.

श्री विलास पठाडे व श्री गणेश घोलप यांनी मूल्यवर्धन, विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य, नवकल्पनांचा प्रभावी वापर यावर प्रकाश टाकला.
या प्रशिक्षणात शिक्षकांना शैक्षणिक नेतृत्व, मूल्यशिक्षण, सकारात्मकता या गोष्टी निर्माण करण्याच्या तंत्राचा अभ्यास करायला मिळाला. त्याचबरोबर अनुभवाची देवाणघेवाण, गटचर्चा आणि कृतीशील सत्रांमुळे प्रशिक्षण अधिक प्रभावी ठरले.

या प्रशिक्षणाचे प्रमुख स्तंभ – मास्टर ट्रेनर्स श्री मनोहर गोडे, श्री नारायण चौधरी, श्री बाळू चौधरी, श्री बाळू खाडे, श्री बाळासाहेब आरोटे, श्री उमेश पवार, श्री बाळासाहेब पांडे, सौ सोनाली मालवणकर, सौ.रोहिणी नवले यांनी शिक्षकांना प्रशिक्षण सुलभ केले. श्री विलास पठाडे व श्री गणेश घोलप यांनी विषय तज्ञ व प्रशिक्षण नियंत्रक म्हणून काम पाहिले. तसेच शांतीलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांनी ज्यांची निवड केली ते श्री गणेश पिचड यांनी मूल्यवर्धन प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम केले.

शिक्षण क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत सहभागी शिक्षक – शिक्षिका यांनी व्यक्त केले. आपल्या भावना व्यक्त केल्या. श्री अर्जुन तळपाडे , श्री दिलीप गंभीरे, श्री युवराज तळपे,सौ. एखंडे मॅडम, श्री तुकाराम बेणके, महादर्पनचे प्रतिनिधी संतु जाधव व शिक्षक – शिक्षिका उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी श्री गणपत सहाणे यांनी सुलभकांचे प्रशिक्षणार्थी शिक्षकांच्या वतीने सत्कार करून आभार मानले.



