सरपंच सेवा संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार कळस चे सरपंच राजेंद्र गवांदे यांना प्रदान

अहिल्यानगर (प्रतिनिधी ) सरपंच सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार कळस गावचे सरपंच राजेंद्र गवांदे यांना प्रदान करण्यात आला.
माऊली संकुल सभागृह आहील्यानगर मध्ये सरपंच संघटीत चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सरपंच उपस्थित होते. यावेळी पोपटराव सोनवणे, रिपाइंचे राज्य संघटक रमेश शिरकांडे, भाजपचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे, कैलास कासार, सावळेराम गायकवाड, कवी अशोक शिंदे, आर्यन गवांदे, रोहिदास ढगे आदी उपस्थित होते.
राजेंद्र गवांदे हे रिपाई चे तालुकाध्यक्ष असून पाच वर्षापूर्वी कळस सारख्या राजकीय दृष्ट्या संवेदनशील गावचे सरपंच पद मिळाले, गावात पदाच्या माध्यमातून गाव अंतर्गत काँक्रीट रस्ते, वीजेची बचत व्हावी या दृष्टीने गावात सौर ऊर्जा पथदिवे, शाळा अंगणवाडीस , सौर पॅनल बसवून कायमस्वरूपी विजेचा प्रश्न सोडविला. दलित वस्ती, कळसेश्वर मंदिर, शाळा परिसरात आरो मशीन प्लॅन्ट बसवून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू केला. डिजिटल शाळा
करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्गाला इन्ट्रॅक्टिव्ह बोर्ड बसविण्यात आले. कळस, सुलतानपूर शाळेस किचन शेड बांधले. गाव अंतर्गत प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. गावात सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने स्टँड परिसरात, स्मशानभूमी, दलीत स्मशानभूमी, सुलतानपूर , हनुमाननगर येथे स्वच्छतागृहांची निर्मिती तसेच मोबाईल टॉयलेटची बांधण्यात आले. स्वच्छ गाव सुंदर गाव या संकल्पनेतून गावात सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंड्या, कचरा पत्रा शेड उभारण्यात आल्या आहेत. व्यक्तिगत व सार्वजनिक ठिकाणी शोषखड्डे सिमेंट टाक्यासहित देण्यात आले. सुलतानपूर मांडवदरा, कळस बु येथे पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. स्मशानभूमी संरक्षण भीत बांधणे, दलित वस्तीत प्रत्येक घरासाठी सौर दिवे बसविन्यात आले आहेत, हेमाडपंती महादेव मंदिर रस्ता , सुलतानपूर शाळा रस्ता, इंदिरा नगर मधील रस्ता, सुलतानपूर येथील सिरतार वस्तीवर जाण्यासाठी असणारा रस्ता, सुलतानपूर गवांदे वस्ती असे अनेक रस्ते काँक्रीटीकरण करून कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सोडविला आहे. दलीत स्मशानभूमीत काँक्रीट करण्यात आले आहे. सांगवी-निमगाव रोड चौक, शिर्के वस्ती चौक, सुलतानपूर चौफुली येथे हायमॅक्स बसविण्यात आले आहेत. तलाठी कार्यालय बांधले आहे. सुलतानपूर येथे सभामंडप, नव्याने बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली आहे व त्यात भव्य अशी भगवान बुद्धांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे . ग्रामपंचायत परिसरात पेव्हर ब्लॉक बसविन्यात आले आहेत . सांडपाण्याचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्यासाठी बंदिस्त गटार करण्यात आली आहे . गाव अंतर्गत पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन विस्तारिकरण काम केले आहे, गाव अंतर्गत प्रत्येक वस्तीसाठी नळ योजना पूर्ण केली आहे. रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 95% वंचित घटकांना घरकुल दिले. रोजगार हमी योजनेअंतर्गत अनेक पशुपालकांना गोठे बांधून दिले आहेत. गावात नेत्र तपासणी व उपचार शिबिर, सर्व रोग निदान शिबिर, कर्करोग तपासणी, रक्तदान शिबीर,आधार कार्ड कॅम्प, आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच मेरी मिट्टी मेरा देश अभियान अंतर्गत गावात कोल्हार घोटी रोडलगत रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आले आहेत, अगदी टँकर ने पाणी घालून झाड जगविण्यात आले आहेत या झाडांनी गावाची शोभा वाढवली असून पर्यावरण पूरक गाव झाले आहे. त्याच बरोबर गावातील धार्मिक, शैक्षणिक कार्यात कायम सहभागी होण्याचे काम सरपंच यांनी केले आहे. दरवर्षी गावात वारकरी भूषण पुरस्कार देऊन धार्मिक काम करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येतो. मागासवर्गीय व्यक्तीं, एकलं महिलांना पिठाची गिरणीचे तसेच अपंग व्यक्तीना संसार उपयोगी वस्तू चे वाटप केले. दलित वस्त्यांमध्ये पेव्हर ब्लॉग बसविणे, स्मशानभूमीत बसण्यासाठी घाटाची निर्मिती करणे, रस्ता काँक्रीटीकरण करणे, भक्त निवास समोरील मंगल कार्यालयास सुशोभीकरण करणे, पाणंद रस्ते, सांगवी रोड काँक्रीटीकरण करणे, पेमगिरी रोड , हनुमान मंदिर रोड, मोहिते वस्ती रस्ता, दलित वस्तीतील रस्ता काँक्रीटीकरण, सभामंडप नुतनीकरण करणे, नूतन आरोग्य उपकेंद्र आदी अनेक कामे प्रस्तावित असून या कामांना तत्वतः मान्यता मिळालेली आहे. किमान केलेल्या पाठपुराव्याने प्रस्तावीत दीड कोटींचे कामे आपण मार्गी लावलेले आहेत असे सरपंच राजेंद्र गवांदे यांनी सांगितले.
विकास कामांच्यासाठी आमदार किरण लहमटे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, माजी उपसभापती मारुती मेंगाळ, भाजपचे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे , अभियंता महेंद्र वाकचौरे, प्रभात चौधरी, ईश्वर वाकचौरे, अगस्ती सह साखर कारखान्याचे संचालक सीताराम वाकचौरे, इंजिनिअर शुभम वाकचौरे, अमोल बोऱ्हाडे, विनय वाकचौरे , सोन्याबापु वाकचौरे, ग्रामविकास अधिकारी के पी भोर, ज्ञानेश्वर सुर्वे, महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे, पत्रकार अमोल शिर्के, अण्णासाहेब चौधरी, विकास वाकचौरे, लिपिक संजय सोनवणे, ग्रामपंचायत कर्मचारी माधव वाकचौरे, शंकर वाघमारे, मीनाक्षी पाठक, उपसरपंच केतन वाकचौरे , ग्रा पं सदस्य दत्तात्रय वाकचौरे, ज्ञानेश्वर वाकचौरे, जिजाबा वाकचौरे,संगीता चौधरी, बाळासाहेब गांडाळ, कमल ढगे, स्वाती सरमाडे, स्नेहल वाकचौरे, कल्याणी कानवडे, संगीता भुसारी, संगीता सावंत, शिवसेनेचे रावसाहेब वाकचौरे, ज्ञानदेव वाकचौरे, नकुल ढगे, संगमनेर कारखान्याचे संचालक अरुण वाकचौरे, सुभाष कानवडे, निवृत्ती मोहिते, सागर वाकचौरे नामदेव निसाळ, गोरख वाकचौरे , राहुल वाकचौरे, गावातील सर्व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी सरपंच व विशेष गुणगौरव केलेल्या मान्यवरांना आयुष्यभर समाजसेवा करण्याचे व्रत दिले.
सरपंच राजेंद्र गवांदे यांच्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.



