इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि ०५/११/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १४ शके १९४७
दिनांक :- ०५/११/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५४,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर हेमंतऋतु
मास :- कार्तिक
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति १८:४९,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति ०९:४०, भरणी ३०:३४,
योग :- सिद्धि समाप्ति ११:२८,
करण :- विष्टि समाप्ति ०८:४५, बालव २८:५२,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:१३ ते ०१:३८ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:३२ ते ०७:५७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५७ ते ०९:२२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:४७ ते १२:१३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:२८ ते ०५:५४ पर्यंत,

दिन विशेष:
त्रिपुरारि पौर्णिमा, गुरुनानक जयंती, कार्तिकस्नान समाप्ति, तुलसी विवाह समाप्ति, कुलधर्म, मन्वादि, अन्वाधान, भद्रा ०८:४५ प., मृत्यू ०९:४० प.,

————–

:

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक १४ शके १९४७
दिनांक = ०५/११/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
स्त्रियांनी आपली मते ठामपणे मांडवीत. हाताखालील लोक चांगले भेटतील. विद्यार्थी वर्गाला चांगला दिवस. कामे सुरळीत पार पडतील. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतील.

वृषभ
संभ्रमित राहू नका. प्रेमातील गैरसमज दूर करावेत. घरगुती कामासाठी वेळ काढावा. कौशल्याच्या जोरावर बाजी मारता येईल. मित्रांशी सुसंवाद साधावा.

मिथुन
नवीन गोष्टी आत्मसात कराल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील. चिकाटी सोडू नका. जोडीदाराशी मतभेद संभवतात. लहान-सहान गोष्टी फार मनावर घेऊ नका.

कर्क
घरगुती अडचणींवर तोडगा काढाल. घरगुती कामाची धांदल राहील. खर्चाचे प्रमाण वाढते राहू शकते. नातेवाईक भेटीला येतील. दिवस दगदगीत जाईल.

सिंह
नोकरीच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. दिवस चांगला जाईल. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल.

कन्या
आवक चांगली राहिली तरी खर्च आटोक्यात ठेवावा. वाहन चालवताना काळजी घ्यावी. कौटुंबिक समस्येतून मार्ग काढता येईल. हातातील कामे यशस्वीरित्या पार पडतील. जबाबदारीची जाणीव ठेऊन वागावे.

तूळ
कामाचा उत्साह वाढेल. नवीन जबाबदारी अंगावर पडेल. दिवस धावपळीत जाईल. चटकन निराश होऊ नका. चिकाटी सोडून चालणार नाही.

वृश्चिक
मनाचे सामर्थ्य वाढवावे. झोपेची तक्रार जाणवेल. जवळच्या व्यक्तिपाशी मन मोकळे करावे. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे.

धनू
कामाचा पसारा आवरता ठेवावा. खात्री केल्याशिवाय समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. अति अपेक्षा बाळगू नका. ध्यानधारणेत मन रमवा. कौटुंबिक गोष्टीत शांतता बाळगावी.

मकर
अतिरिक्त काम अंगावर घेऊ नका. वेळ आणि काम यांचे नियोजन करावे. इतरांना मदत करण्यात समाधान मनाल. कामातील क्षुल्लक अडचणी दूर करता येतील. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कुंभ
तूर्तास कोणत्याही निर्णयाची घाई करू नका. लहान प्रवास घडतील. गुरुजनांचा आशीर्वाद मिळेल. अधिकारी लोकांची गाठ पडेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मीन
जोडीदाराशी वाद वाढवू नका. वैवाहिक जीवनात ताळमेळ साधावा लागेल. अचानक धनलाभ संभवतो. एखादी चांगली संधी चालून येऊ शकते. सबुरीने व शांततेने निर्णय घ्यावा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button