अकोले तालुक्यातील अबीतखिंड येथे शनिवार दि. ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी क्रांतीवीर राघोजी भांगरे (भांगरा) व क्रांतीवीर बिरसा मुंडा १५० वी जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
सर्वोदय विद्या मंदिर आबिटखिंड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबिटखिंड,व ग्रामस्थ भोजनेवाडी, वाजेवाडी यांच्यावतीने शनिवार दि. ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वा. सर्वोदय विद्या मंदिर, आबिटखिंड येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले असून सकाळी क्रांतिकार कांना अभिवादन व प्रभात फेरी चे आयोजन केले आहे
आदिवासी कल्याण, सबलीकरण आणि समावेशक विकासासाठी काम करणारे अबितखिंड गावचे सुपुत्र कर्मयोगी श्री रामनाथ नामदेव भोजने यांचा जनजातिय कार्य मंत्री आदिवासी व्यवहार मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात नुकताच सन्मान झाला त्या बददल श्री भोजने यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे
या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, ग्रामपंचायत आबिटखिंड, सरपंच,उपसरपंच, सर्व सदस्य श्री सद्गुरु उंबरबाबा कला, क्रिडा व संस्कृती मंडळ, आबिटखिंड भैरवनाथ सेवा मंडळ आबिटखिंड आदिवासी वि.का. सहकारी सोसायटी मर्या. आबिटखिड सह्याद्री आदिवासी सेवा संघ व ग्रामस्थ, यांचे वतीने करण्यात आले आहे,