इतर

अकोले व राजूर येथील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा – हेरंब कुलकर्णी यांचे जिल्हापोलीस अधिक्षक यांना पत्र

अकोले प्रतिनिध

 अकोले तालुक्यात अवैद्य दारू मोठ्या प्रमाणावर वाढली आहे याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही त्याचे प्रमाण कमी होत नसल्याने अकोले व राजूर  येथील पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीचे पत्र दारूबंदी समितीचे  सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना दिले आहे

 यात म्हटले आहे की यापूर्वी अकोले तालुक्यातील अवैध दारूविषयी आपल्याकडे अनेकदा तक्रारी केल्या पण अवैध दारू सुरूच आहे. आम्ही आंदोलनही स्थगित केले पण काहीही बदल झाला नाही. राजूर हे दारूबंदी असलेले गाव आहे. या ठिकाणी पवार हे पोलीस अधिकारीआल्यानंतर त्या गावात दारू विक्री कमी न होता विक्री करणारी ठिकाणे वाढले आहेत. मटका मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पोलीस स्टेशनमधील पोलिसांचे दारू विक्रेते यांच्याशी संबंध आहेत.
अकोल्यात अनेकदा पोलीस निरीक्षक यांना भेटलो पण तरीही लिंगदेव, लहित बु, लहित खु, कोतूळ, ब्राह्मणवाडा, चास, पिंपळगावखांड, कळस, शाहूनगर, इंदोरी फाटा, रुंभोडी, देवठाण , डोंगरगाव, समशेरपूर, खिरविरे, पिंपळगाव नाकाविन्दा,गणोरे, धाम्भोडी फाटा तिरडे, वीरगाव या गावांमध्ये आजही दारू विक्री खुलेआम सुरु आहेत. अकोले तालुक्यात दारू ही संगमनेर येथील ३ दुकानातून येते. घारगाव येथून दारू येते. विभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना अनेकदा या गाड्या पकडाव्या अशी विनंती केली पण ते गांभीर्याने घेत नाहीत. 

याबाबत कोणतीही कार्यवाही ते करत नाहीत
याबाबत आपण त्यांना दारू वाहतूक बंद करण्याचे आदेश द्यावेत.  अकोले आणि राजूर येथे मोठ्या प्रमाणात तरुणांचे दारूमुळे मृत्यू होत आहेत. पण ही दारू थांबवली जात नाही. खूप तक्रारी करूनही कठोर कारवाया होत नाहीत. तेव्हा आपण विभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांना संगमनेर येथून होणारी दारू वाहतूक थांबवण्याचे आदेश द्यावेत व अकोले राजूर पोलीस स्टेशनवर कारवाई करावी
ज्या बीटमध्ये अवैध दारू सापडेल त्या बीट अंमलदार व पोलीस पाटील यांच्यावर कारवाई करण्याची सुरुवात करावी तरच यंत्रणा उत्तरदायी होईल.असे हेरंब कुलकर्णी यांनी म्हटले आहे

—–=====—

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button