अकोले शहरासाठी रिंगरोड म्हणून उजव्या कालव्याचे डांबरीकरण करा, – ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना साकडे

अकोले ( प्रतिनिधी)
अकोले शहरासाठी रिंगरोड म्हणून पर्याय असणाऱ्या निळवंडे धरणाचे उजव्या कालव्याचे कळस ते इंदुरी असे डांबरीकरण करण्यात यावे व कालव्यासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीची मोजणी करून जास्तीची जमीन शेतकऱ्यानंच्या नावावर पुन्हा करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे भाजपची सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी केली आहे
जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे अकोले शहराला लगत आहेत. शहरांमध्ये खूप वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अकोले शहराला रिंग रोडची खूप आवश्यकता आहे. परंतु यासाठी भूसंपादन हा मोठा प्रश्न निर्माण होईल. परंतु या कालव्यांमुळे भूसंपादनाचा प्रश्न मिटू शकतो या कालव्यांमुळे अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतुकीचा ही प्रश्न सुटू शकतो कळस पासून ते इंदुरी पर्यंत या या कालव्यांचे मजबुतीकरण खडीकरण व डांबरीकरण जर केली तर अकोले शहरातील वाहतूक समस्या कमी होईल. निळवंडे धरणाचे कालवे खालच्या बाजूने पाच मीटर म्हणजे १८ फुटाचे असल्यामुळे रस्त्याचा प्रश्न यामुळे सुटणार आहे.
कळस, सुगाव, मनोहरपुर वाशेरे, परखतपूर, अगस्ती साखर कारखाना, धुमाळवाडी नवलेवाडी, औरंगपूर, उंचखडक, इंदुरी या गावातील जोडरस्ते या कालव्याला जोडले जातील आणि त्यामुळे त्या गावातीलही वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो.
निळवंडे धरण प्रकल्प आता पूर्ण झाला असून या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन खूप मोठ्या प्रमाणात झालेले आहे. कालव्यासाठी तिप्पट प्रमाणात भूसंपादन झालेले आहे

अकोले तालुक्यामध्ये शेतकरी हे कमी क्षेत्रावाले आहेत त्यामुळे अनेकांच्या शेती कमी झालेले आहेत जमिनी संपादन करताना जुन्या काळामध्ये मोजणी न करता अंदाजे संपादन केलेले आहेत यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी विभागणी झालेली आहे काही जमिनी कालव्याच्या वरून तर काही जमिनी कालव्याच्या खालून असाही परिणाम झालेला आहे तसेच जमिनीचे संपादन करताना मातीचे कालवे असल्याने त्यासाठी जास्त संपादन झालेले आहे.आज कालव्यांचे अस्तरीकरण होणार असून तसेच आता बंद पाइपने पाणी दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या जादा भूसंपादित केलेल्या जमिनीची मोजणी होऊन विशेष बाब म्हणून या जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या नावावर ती करण्यात याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी भूसंपादन करताना ती म्हाळादेवी धरणाचे कालवे असल्यामुळे जास्त जमिनीचे भूसंपादन झालेले आहे . त्या जमिनी आजही शेतकरी यांच्या ताब्यात असून सातबारा उतारा सरकारच्या नावावर झाला आहे त्यामुळे त्याला कर्ज काढणे व इतर कामासाठी त्याचा उपयोग होत नाही. तसंही आता सरकारला या जमिनीचा कुठलाही उपयोग राहिलेला नाही कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात असल्याने आता या कालव्यासाठी जमिनीची आवश्यकता राहिली नाही त्यामुळे या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर पुन्हा होण्याची गरज आहे.
अकोले तालुक्याचे भाग्यविधाते मधुकररावजी पिचड यांनी निळवंडे धरणासाठी धरण लाभ क्षेत्रातील आठ एकर पेक्षा चे जास्त क्षेत्र पुनर्वसन साठी राखीव असा शेरा रद्द करून शेतकऱ्यांना पुन्हा दिले आहेत. त्याचप्रमाणे चितळवेढे येथे धरणासाठी संपादित केलेली जमीनही शेतकऱ्यांच्या नावावर पुन्हा करून दिलेले आहे. त्यामुळे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रांतिकारी निर्णय पिचड साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून या जमिनी शेतकऱ्यांना पुन्हा मिळून द्याव्यात.


