अकोले तालुक्यात मुख्यमंत्री सडक रस्त्यांच्या कामात गुणवत्तेचा घोटाळा!

न झालेल्या कामासाठी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना वाटली बिलाची खिरापत!
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये गुणवत्तेचा मोठा घोटाळा झाला आहे प्रत्यक्ष काम न करता ही त्या कामाचे बिल ठेकेदारांना अदा करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदारांना बिलाची खिरापत वाटली आहे या संपूर्ण कामांची चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे
गर्दनी- बारामती रोड ते मुख्य रस्ता, पिंपळगाव निपाणी ते तालुका हद्द, लिंगदेव ते धुपे रस्ता, हिवरगाव गणोरे ते खतोडे वस्ती, वाघजाळी ते इ जि मा २७, मोरेवाडी ते खैरदरा, सांगडेवाडी कुरकुंडी रस्ता, कोठे बु ते वनकुटे रस्ता, इ जि मा १८ ते बहिरवाडी रस्ता तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या सर्व रस्त्यांची कामे सुरू आहेत परंतु सुरू असणारे रस्ते मुख्य उद्देश बाजूला ठेवून ठेकेदारांनी कामे न करता बिल कसे देता येतील हा मुख्य उद्देश समोर ठेवून कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाने हा घाट घातला आहे मिळालेल्या माहिती नुसार मार्च 2025 ला काम न होता सदर कामाचे खोदकाम ,भरावा, खडीकरण, सिमेंट काँक्रीटचे अशी काही कामे अंदाज पंचे खोटी रेकॉर्ड करून अंदाजे ५ कोटी रुपये मध्ये कार्यकारी अभियंता यांनी अँडव्हान्स पेमेंट ठेकेदारांना अदा केले परंतु प्रत्यक्षात खोदकाम भरावे मामुली स्वरूपात झाली प्रत्यक्षात बिलामध्ये जेवढी रकमा अदा झाल्या तेवढी कामे झाली नाही त्यामुळे रस्त्यांना तीव्र स्वरूपात चढ उतार राहिले आहेत व वळण सुधारणा रुंदीकरण कामे झाली नाही ह्या प्रकारे खोदकामात मोठा अपहार झाला तसेच थोड्या प्रमाणात GSB दाखवून कमी जाडीचे काम करण्यात आले व बील पूर्ण रकमेचे अदा करण्यात आले आहे तदनंतर ड्रायलीन काँक्रीट यामध्ये निकृष्ट दर्जाची खडी, जास्त प्रमाणात फ्लाय अंश व सिमेंटचे प्रमाण कमी तसेच कमी प्रतीचे सिमेंट मुळे ड्रायलीन काँक्रीट पूर्णपणे दर्जाहीन झाले आहे

सध्या स्थितीला सर्व ठिकाणी ड्रायलीन काँक्रीटचे बोजवारा उडाला आहे तसेच काँक्रीट रस्त्याचा फायनल लेयर पी क्यू सी (PQC) ह्या मध्ये सिमेंट चे प्रमाण कमी व कमी प्रतीचे सिमेंट,निकृष्ट दर्जाची खडी ,दर्जाहीन वाळू, फ्लाय अश चे काँक्रिट मध्ये मिक्सिंग यामुळे काँक्रीट चा दर्जा अत्यंत दर्जाहीन दिसून येत आहे झालेले काम तीन महिन्यांमध्ये संपूर्ण रस्त्यावरती क्रॅक निर्माण झाले आहे व झालेला रस्ता दोन वर्षाच्या आत पूर्णपणे उघडला जाणार आहे तरी अशाप्रकारे झालेली सर्व कामे किमान अंतिम लेयर जो खराब झाला आहे तो पूर्णपणे काढून टाकून नव्याने नवीन काँक्रीट करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे तसेच ज्या भागात जीएसबी झाले नाही ड्रायलीन काँक्रेट निकृष्ट दर्जाचे झाले ही पेमेंट कॉन्ट्रॅक्टरला अदा करू नये ही सर्व कामे नव्याने करण्यासाठी सूचना करण्यात याव्यात व ही कामे झाल्यानंतर अंतिम लेयर पीक्यूसी (PQC) ची कामे गुण नियंत्रण नाशिक विभाग यांच्याकडून तपासून घेऊन त्यानंतरच करावी अशी मागणी करण्यात आली आहे
मुख्यमंत्री सडक योजनेची अकोल्यात सुरू असणारी कामे कामे १० वर्षे तर सोडाच पण २ वर्ष सुद्धा टिकणार नाही म्हणून काम करण्यासाठी घाई न करता ती कशी उत्तम प्रतीची होतील ह्या साठी उपाययोजना करावी नाहीतर प्रत्येक ठिकाणचे ग्रामस्थ या प्रकारची बोगस निकृष्ट दर्जाचे कामे स्वतः पोकलेन जेसीबी लावून उखडून टाकतील असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी दिला आहे


