आजचे पंचांग व राशी भविष्य दि ०१/०२/२०२६,

: 🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १२ शके १९४७
दिनांक :- ०१/०२/२०२६,
वार :- भानुवासरे(रविवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०४,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२२,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति २७:३९,
नक्षत्र :- पुष्य समाप्ति २३:५८,
योग :- प्रीति समाप्ति १०:१९,
करण :- विष्टि समाप्ति १६:४३,
चंद्र राशि :- कर्क
रविराशि – नक्षत्र :- मकर – श्रवण,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- मकर,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- संध्या. ०५नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:५७ ते ०६:२२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:५३ ते ११:१८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ११:१८ ते १२:४३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०८ ते ०३:३२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
माघस्नान समाप्ति, कुलधर्म, अन्वाधान, भद्रा १६:४३ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ १२ शके १९४७
दिनांक = ०१/०२/२०२६
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील विचित्र कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. कामात स्त्रियांची मदत मिळेल. बदलाला अनुसरून वागावे.
वृषभ
जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून मतभेद संभवतात. उगाच विरोध करत बसू नका. भागीदारीत अधिक लक्ष घालावे. नवीन वस्त्र खरेदी कराल. कामाचे योग्य नियोजन करावे.
मिथुन
क्षुल्लक मतभेद मनात धरून ठेवू नका. जुन्या दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या वागण्याने इतरांची मने जिंकून घ्याल. चांगले औद्योगिक वातावरण लाभेल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
कर्क
मनाची विशालता दाखवाल. मानसिक दोलायमानता जाणवेल. लिखाणात चांगली प्रगती करता येईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. जोडीदाराच्या स्वभावाची नवीन बाजू लक्षात येईल.
सिंह
सहकुटुंब बाहेर जाण्याचा बेत आखाल. शेअर्सच्या कामातून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. धाडसाने कामे हाती घ्याल. मुलांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.
कन्या
जोडीदाराची कलेच्या क्षेत्रात प्रगती होईल. आकर्षणाला बळी पडू नका. प्रेमसौख्याला बहर येईल. उत्तम गृहिणीपदाचा मान मिळेल. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवाल.
तूळ
नोकरांचे सुख चांगले राहील. दिवस काहीसा आळसात जाईल. लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. नातेवाईकांची मदत घेता येईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.
वृश्चिक
कलेसाठी वेळ काढता येईल. गप्पा-गोष्टींची आवड पूर्ण कराल. जुगारातून लाभ संभवतो. निसर्ग सौंदर्यात रमून जाल. छंद जोपासायला वेळ काढता येईल.
धनू
कौटुंबिक काळजी लागून राहील. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कामाची लगबग राहील. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. उष्णतेचे विकार जाणवतील.
मकर
सामाजिक वादात अडकू नका. धार्मिक कामात सहभाग घ्याल. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. कर्ज प्रकरणात सध्या अडकू नका. गैरसमजुतीतून वाद वाढू शकतो.
कुंभ
कफाचा त्रास जाणवेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. मदत करतांना मागे-पुढे पाहू नका. निसर्गाच्या सानिध्यात रममाण व्हाल. जवळचा प्रवास घडेल.
मीन
सर्वांशी लाघवीपणे बोलाल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. बौद्धिक चलाखी दाखवाल. शांत व विचारी निर्णय घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर



