आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१४/०२/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २५ शके १९४७
दिनांक :- १४/०२/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:५९,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:२८,
शक :- १९४७
संवत्सर :- विश्वावसु
अयन :- उत्तरायण
ऋतु :- सौर शिशिरऋतु
मास :- माघ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति १६:०२,
नक्षत्र :- पूर्वाषाढा समाप्ति १८:१६,
योग :- सिध्दि समाप्ति २७:१८,
करण :- गरज समाप्ति २८:३८,
चंद्र राशि :- धनु,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ – धनिष्ठा,
गुरुराशि :- मिथुन,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०४प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:५१ ते ११:१७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२५ ते ०९:५१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:१० ते ०३:३६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३६ ते ०५:०२ पर्यंत,
❀ दिन विशेष:
शनिप्रदोष, व्दादशी श्राध्द,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- माघ २५ शके १९४७
दिनांक = १४/०२/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
घरात नातेवाईक गोळा होतील. दिवस व्यग्रतेत जाईल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. लहानांमध्ये मन रमेल. गप्पा-गोष्टींमध्ये वेळ घालवाल.
वृषभ
व्यावहारिक हजरजबाबीपणा दाखवाल. चातुर्याने व्यवहार कराल. आवडते पुस्तक वाचाल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. फायद्याकडे लक्ष द्यावे.
मिथुन
चंचलपणे वागू नये. कलेतून चांगली कमाई होईल. प्रगल्भ लिखाण कराल. धोरणीपणे वागणे ठेवाल. शिस्तीचा फार बडगा करू नये.
कर्क
दिवस स्वच्छंदीपणे घालवाल. अति विचार करू नयेत. भावंडांची काळजी लागून राहील. स्मरणशक्तीला जोर द्यावा लागेल. आपलेपणाची जाणीव ठेवून वागाल.
सिंह
छुप्या शत्रूंवर विजय मिळवता येईल. विरोधकांचा जोर मावळेल. हाताखालील लोक उत्तम सहकार्य देतील. व्यवहार कुशलता दाखवावी लागेल. बौद्धिक कामात गती येईल.
कन्या
उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.
तूळ
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.
वृश्चिक
घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.
धनू
स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल.
मकर
चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.
कुंभ
स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल.
मीन
झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


