अकोल्यातील जळीतग्रस्त गंभीरे कुटुंबाला आधार फाउंडेशन ची मदत

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजुर येथील कौठवाडी उंच डोंगरावर असलेले अतिदुर्गम भागात धोंडीबा लक्ष्मण गंभीरे या कुटुंबांचे घर जळाल्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले होते. शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली व दुर्घटना घडली.
आधारचे शिलेदार दिपक बोऱ्हाडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आधारला या घटनेची माहिती दिली.
धोंडीबा लक्ष्मण गंभीरे कुटुंबाच्या मदतीसाठी आधारने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. कुटुंबाला एक महिना पुरेल इतका किराणा, दोन धान्य कट्टे दिले.आधार फाउंडेशनने घरगुती वापराची सर्व भांडीकुंडी यांचे एक सेट दिला. दोन सतरंजी, सर्वांना नवीन कपडे,दोन ब्लांकेट, आदी महत्त्वाचे संसार उपयोगी साहित्य पोहच केले़.

या कुटुंबाच्या मदतीसाठी आधारचे शिलेदार संजय तळपाडे , रावसाहेब गेनू पावसे, रामदास गंगाराम सोनवणे, इंजि. संतोष भुजबळ,रमेशशेठ नेवासकर, विजया नारायण मिसाळ या सर्वांनी आर्थिक स्वरूपात आधारला मदत केली.
आधार फाउंडेशनने मानवतेच्या दृष्टीने केलेल्या मदतीमुळे या कुटुंबांना दिलासा मिळाला असल्याचे मत दिपक बोऱ्हाडे यांनी व्यक्त केले. तर गरजू समाज बांधवांना मदतिचा हात देणे आपले कर्तव्यच आहे असे माजी ग्रामपंचायत सरपंच सुरेश भांगरे व राजू धांदवड यांनी सांगितले.
ही सर्व मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यासाठी विठ्ठल कडूसकर , सोमनाथ मदने , डॉ. महादेव अरगडे, सुखदेव इल्हे सर, बाळासाहेब पिंगळे सर, पी.डी. सोनवणे ,अनिल कडलग विनोद राऊत ,दीपक बोऱ्हाडे,ऋषिकेश शिंदे, पर्यावरण प्रेमी राहुल राऊत, सुनील आरोटे,माजी सरपंच सुरेश भांगरे, बाळू भांगरे, निलेश तळेकर,राजू चांदवड, रावजी गंभीरे, देविदास भाईक,दिनकर गभाले, रमेश शेठ नेवासकर, तुषार शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.
=============



