इतर

शेणीत (ता अकोले) येथे संत निरंकारी सतसंग सोहळा संपन्न

एस. के. जाधव. /प्रतिनिधी
दि. २१ शेणीत – सद्गुरू माता सुदिक्षा सविंदर हरदेव सिंह जी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी भवन ,शेणीत या ठिकाणी अहिल्यानगरचे झोनल प्रमुख सद्गुरू स्वरूप महात्मा प.आ.हरिषजी खुबचंदानी ह्यांच्या उपस्थितीत प्रसंन्न वातावरणात सतसंग पार पडला.

या सत्संग ची सुरुवात अवतारवाणी हरदेव वाणी ने झाली. महापुरुषांनी गित अभंग आणि अवतारवाणी, हरदेव वाणी वर आधारित मानवतेचा आणि विश्वशांतीचा, मुर्ती पुजा आणि पाखंडापासुन दुर राहुन समानतेचा आणि सर्व सजीवांना तितकाच सन्मानपुर्वक जगण्यचा अधिकार आहे. आत्ममंथन आणि आत्मसन्मान करण्याचा मोलाचा संदेश दिला. महात्मा हरिषजी यांच्या सुंदर वाणीतुन सर्व धर्म समभाव, आवतारवाणी हरदेववाणी , पांच प्राण आणि तिन कर्म – सेवा ,स्मरण, सत्संग भर देत जीवन शांततामय आणि सुखी करण्यासाठी उपदेश केला.

जीवन फुलविण्याचे कार्य सद्गुरू करतात, अहंकारी मार्गापासून दूर करतात म्हणून जन्माला आल्यानंतर सद्गुरू करावा. मुखाने भगवंताचे नाम घ्यावे मग तो माणूस कोणत्याही जाती धर्मातील असला तरी तन – मन – धनाने सेवा करण्याची तळमळ मनात असावी. त्यासाठी त्यांनी वृक्ष, नदी, ढग कसे परोपकार करतात ते सांगीतले. मनात जर एखादया बद्दल द्वेष असेल तर आपण ईश्वराशी जोडले जाऊ शकत नाही म्हणून राग, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अंहकार हे विकार सोडून दिले पाहीजे. प्रेमाने जग जिंकता येते आणि सर्वांच्या मनावर राज्य करता येते अशी प्रेमाची शिकवण दिली.


मानव जन्म मिळणे अतिदुर्लभ आहे.जन्माला आल्यानंतर देव,परमात्मास जाणुन घेण्याची इच्छा होणे.आणि परमात्मा, देव जाणुन विवेक बुद्धीने ज्ञानाचे जिवनात,आचरण, कृती, कर्म करणे. भुतलावर स्वर्ग आवतरुन जग सुंदर होईल आणि मानवी जन्म पुर्णत्वास जाईल असा बहुमोल उपदेश केला. या दुर्लभ महत्त्वपुर्ण बाबीवर मार्गदर्शन करत सर्वच उपस्थितांस मंत्रमुग्ध केले.सत्संगासाठी घाटकोपर,ठाणे ,डोंबिवली,कल्याण,घोटी ,नाशिक अकोले तालुक्यातील एकदरे,पाडोशी ,तिरडे. पिंपरकणे, आंबेवंगण, लाडगाव ,मान्हेरे,रंधा,वाकी ,वारंघुशी,बारी, मुरशेत, करंडी ब्राह्मणवाडा, धामणवण येथील संत महापुरुष हजर होते. राजुर युनिट चे सर्व सेवादल महात्मा व राजूर ब्रँच चे प्रमुख गोरख परते, संचालक सखाराम गोदके , आयोजक सर्व शेणीत सत्संग व नियोजक विठ्ठल शिंदे यांच्या आदेशाने सर्व सत्संग पार पडला.
या भव्य सत्संग सोहळ्याचे सुत्रसंचलन महात्मा प्रणय जगधने यांनी केले. मंगलचरण होऊन उपस्थित संतसंग महापुरुष गावकरी यांचे आभार मानले. महाप्रसादनंतर सत्संगाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button