आर्टी च्या वतीने लोणी येथे मातंग समाज विद्यार्थी व पालकां साठी मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

लोणी दि 05
आण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मुंबई, या शासकीय स्वायत्त संस्थेच्यावतीने एक दिवशीय मातंग समाज विद्यार्थी व पालक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन रविवार दि. १७/५/२०२६ रोजी सकाळी ९.३० वा. सुरभी मंगल कार्यालय लोणी ता राहता येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रा डॉ बी आर पवार, लहाणू खरात यांनी दिली
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.सुनिल वारे, निबंधक श्रीमती इंदिरा आस्वार मॅडम आणि त्यांचे सर्व अधिकारी वर्ग हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
आर्टीच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, मोफत प्रशिक्षण, प्रशिक्षण कालावधीत मिळणारे विद्यावेतन याची माहिती देणार आहेत. तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील (उत्तर विभाग) अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपुर, नेवासा आणि राहुरी या तालुक्यातील इ. १० वी व त्यापुढील उच्च शिक्षित विद्यार्थ्यानी या शिबीरासाठी उपस्थित राहून या संधीचा फायदा घ्यावा. असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरी सेवा परिक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षा, तसेच अराजपत्रित गट ब व गट क सेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, JEE व NEET परिक्षा, न्यायिकसेवा, बँक, रेल्वे, एलआयसी, नाबार्ड परीक्षा, पोलीस व आर्मी सेवा, कर्मचारी निवड आयोग वर्ग – ३ यांचे पुर्व प्रशिक्षण इ. बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री. संजय शिंदे,श्री. लहानु खरात, श्री भागाजी जाधव,श्री. संजय भोंडवे, श्री. शिवाजी वायदंडे, प्रा रघुनाथ खरात प्रा. डॉ. भाऊसाहेब पवार,प्रा. डॉ. साहेबराव गायकवाड,श्री. दिपक जाधव अॅड. विक्रम गायकवाड,श्री.विश्वनाथ आल्हाट,प्रा.डॉ.सुदाम शिंदे,श्री. संभाजी पवार प्रा. डॉ. भाऊसाहेब रणपिसे,श्री. गुलाबराव भडकवाड,प्रा.डॉ.अंकुश सुर्यवंशी,प्रा.डॉ.रोहित भडकवाड,श्री. बाळासाहेब बोरुडे श्री. शशिकांत शेलार श्री. प्रकाश जगधने श्री. रविंद्र कांबळे यांनी केले आहे
===========



