ग्रामीण भागात आधार कार्ड शिबिराची गरज -रामदास फुले

नेप्ती येथे भारतीय डाक विभागाच्या आधार शिबिरास प्रतिसाद
अहिल्यानगर प्रतिनिधी
– नगर तालुक्यातील नेप्ती येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय डाक विभागाच्या वतीने अहिल्यानगर आर. एस. केडगाव पोस्ट ऑफिसमार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष आधार नोंदणी व अद्ययावत सेवा शिबिर उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले अप्पर अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दिवसभर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध आधार सेवांचा लाभ घेतला .शिबिरामध्ये लहान बालकांची नवीन आधार नोंदणी, पाच वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचे बायोमेट्रिक अद्ययावतीकरण, आधार कार्डशी मोबाईल क्रमांक संलग्न करणे तसेच नाव, पत्ता, जन्मतारीख, छायाचित्र आणि इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती व अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नागरिकांच्या आधार संदर्भातील तक्रारी आणि अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केल्याचे रामदास फुले यांनी सांगितले
नेप्ती ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात जाऊन आधार सेवा घेण्याची गरज भासू नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शिबिरादरम्यान ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. अनेक नागरिकांनी आधारमधील त्रुटी दूर करून घेतल्या, तर काहींनी मोबाईल क्रमांक अद्ययावत करून घेत विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. दिवसभर डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांना मार्गदर्शन करत सेवा तत्परतेने उपलब्ध करून दिल्या.
या कार्यक्रमास आधार ऑपरेटर मदनलाल मीना, सब पोस्ट मास्टर अहिल्यानगर आर एस केडगाव, अमित कोरडे , शिवम पवार, सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले , माजी उपसरपंच जालिंदर शिंदे, सुरेश कदम, ज्ञानेश्वर गडाख, भानुदास फुले ,शंकर फुले, हिराबाई राऊत,पायल साळवे,मंदा साळवे ,शिवांश जपकर, श्रावण जपकर, हर्षद बेल्हेकर, विजय साळवे, संदेश साळवे, करिष्मा साळवे, प्रथमेश वैराळ, शितल वैराळ, पियुष वैराळ, सर्वज्ञ चौरे, पप्पू वैराळ, आरा सय्यद ,गुलाब सय्यद, महबूब सय्यद, मोहन कदम, रुबीना सय्यद, बिस्मिल्ला सय्यद, नितीन साळवे, उज्वला साळवे, वैशाली चौगुले, साधना पवार, गायत्री धोत्रे,रबिया सय्यद, व परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना आधार कार्डमधील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी किंवा अद्ययावत करण्यासाठी शहरात जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढतो. भारतीय डाक विभागाने नेप्ती येथे आयोजित केलेले हे विशेष शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असून अशा उपक्रमांमुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अशा सेवा आधार शिबिराची गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “आज आधार कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी अत्यावश्यक दस्तऐवज बनले आहे. शासकीय योजना, शैक्षणिक प्रक्रिया, बँकिंग व्यवहार यांसाठी आधारची आवश्यकता भासत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच या सुविधा उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. ग्रामपंचायत, डाक विभाग आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वी झाले

