इतर

सोलापूरकरांकडून फळ व फळभाज्यांमधील बियांचे उत्स्फूर्तपणे दान…

.

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान व पद्मकमळ परिवाराचा उपक्रम

सोलापूर- सध्याचा उन्हाळा अनेकांना ‘सळो की पळो’ करुन सोडले आहे. उन्हाचा वाढलेला पारा संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये त्रासदायक झाला आहे. सोलापूरकर सुध्दा यामधून सुटले नाहीत. उन्हाचा त्रास सोलापूरकरांनी अनुभवला आहे. दिवसेंदिवस पारा वाढतच जाणार, हे ओळखून सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन, पद्मशाली सखी संघम, वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठान आणि पद्मकमळ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोलापूरकरांकडून खाल्लेल्या फळांतील बियां व फळभाज्यांमधील बियांचे दान करण्याचे आवाहन स्थानिक वृत्तपत्रांतून व सोशल मिडियाच्या माध्यमातून केले होते, त्यानुसार अनेकांनी उत्स्फूर्तपणे आणून दिले.

पूर्व भागातील श्रीराम मंदिर देवस्थान येथे अंब्याचे कोय, जांभळ्यांचे बिया, कोरफड, फणस, एरंडी, चिंच, गोकर्ण, पारिजातक, आलूबुखार, खजूर आदी बिया आणून दिले आहेत. आणून देणा-यांमध्ये प्रामुख्याने महिलांचा अधिक सहभाग होता. यावेळी वि. दा. सावरकर चॅरिटेबल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. राजेंद्रप्रसाद गाजूल, फाउंडेशनचे किशोर व्यंकटगिरी, बालाजी कुंटला, वैकुंठम् जडल, ओमसी पल्ली, मल्लेशम जोगू, पद्मशाली सखी संघमच्या पल्लवी संगा, हेमा मैलारी, वनिता सुरम, पद्मा मेडपल्ली आधी उपस्थित होते.



नागरिकांना आवाहन…

रेल्वे, बस, कार मधून प्रवास करताना किंवा घरात असताना जेव्हांही विविध प्रकारांच्या फळे खाताना त्यातील बिया काढून कच-यात टाकण्यापेक्षा माती असलेल्या ठिकाणी घालावेत. याचबरोबर प्रत्येकाने एका रोपाचे संगोपन केलेच पाहिजे. कारण, सध्याच्या परिस्थितीवर हा एकच उपाय आहे. लहान मुलाचे जसे संगोपन करतो, अगदी त्याप्रमाणेच. रोपांना अन्नाची गरज भासत नाही. फक्त एक वाटीभर पाणी. मुलं जसे मोठे होताना पाणी पितो, त्याप्रमाणे पाणी घालावे लागेल एवढेच. असे आवाहन फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button