इतर

प्रांतअधिकारी अरुण उंडे  यांची कोतुळेश्वर देवस्थान ला भेट!

नव्या पिढीला अध्यात्माला जोडण्याचे काम करावे -प्रांतधिकारी

कोतुळ प्रतिनिधी 

संगमनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे  यांनी कोतुळ  (ता अकोले) येथील श्री क्षेत्र कोतुळेश्वर महादेव देवस्थान ला भेट देत  देवस्थान परिसरातील विकास कामांची पाहणी केली यांनी

 आमदार डॉ. किरण लहामटे  यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले  त्यांनी श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्थेच्या कामाजकाजाचा आढावा घेतला यावेळी  देवस्थान च्या वतीने  त्यांचा सत्कार केला  याप्रसंगी त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आगामी काळात या शिक्षणाची गरज  आहे  

 अध्यायत्मा ला जोडलेली ही शेवटची पिढी आहे  वारकरी शिक्षण संस्थेतील  विद्यार्थ्यांनी यापुढील काळात नव्या पिढीला अध्यात्माला जोडण्याचे काम करावे असे त्यांनी यावेळी सांगितले  

निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या श्रीक्षेत्र कोतुळेश्वर मंदिर परिसरात परिसरात सुरु असलेल्या मंगल कार्यालय व भक्तनिवास कामाची पाहणी केली   आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांमध्ये ते काही काळ रमले 

यावेळी नायब तहसीलदार गणेश माळवे, दत्तात्रय महाराज भोर, ह भ प नितीन महाराज गोडसे, देवस्थानचे विश्वस्त  योगेश  देशमुख,   अभिजीत देशमुख,राजू पाटील देशमुख,हेमंत देशमुख, बाबासाहेब देशमुख, रवींद्र  आरोटे, राधाकिसन गोडसे,पत्रकार सुनील गीते, आदी उपस्थित  होते 

==========

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button