ग्रामपंचायतीचे वाढीव कर ग्रामीण भागात कमी करावे रुंभोडी ग्रामसभेत मागणी

भाऊसाहेब वाकचौरे /रुंभोडी प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रुंभोडी गावची ग्रामसभा काल मंगळवारी ग्रामपंचायतच्या सभागृहात प्रशासक रवींद्र मालुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली शासनाने वाढविलेले ग्रामपंचायत कर ग्रामीण भागात कमी करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली
ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी होती सुरुवातीला ग्रामसभेच्या विषय पत्रिकेचे वाचन ग्रामपंचायत अधिकारी जी.आर धराडे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतने भोर कडा येथे गेल्या वर्षी वृक्ष लागवड केली मात्र त्यावेळी येथील मोठी झाडे तोडण्यात आली त्याचा लिलाव न करताच तो वैयक्तिक व्यापाऱ्याला दिला त्या झाडांचा सार्वजनिक जाहीर लिलाव का केला नाही असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते संतोष मालुंजकर यांनी उपस्थित केला यावरून सुरुवातीलाच ग्रामसभेत खडाजंगी झाली या प्रश्नाला सरपंच यांनी समर्पक उत्तर देऊन त्याचे निराकरण केले ग्रामसभेत
आरोग्य उपकेंद्राच्या सौ गुंजाळ यांनी उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामस्थ महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या आरोग्य विषयक उपक्रमाची माहिती दिली ग्रामपंचायत अधिकारी यावेळी ग्रामपंचायत हद्दीतील शासकीय जागेत 2011 पूर्वी बांधलेली निवासी घरे अतिक्रमण केलेल्या असून त्यांना सरकारच्या नियमानुसार नियमित करण्याचे निर्देश असल्याने त्याबाबत ग्रामस्थांना माहिती दिली. तसेच गावातील वंचित व गरीब ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या संदर्भात झालेल्या सर्वेनुसार 170 ग्रामस्थांना मंजूर झालेल्या यादीचे वाचन ग्रामसभेत करण्यात आले ज्यांचे RCC पक्या इमारती आहेत त्यांचे नावे सदर यादीतून रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले यास ग्रामसभेने याला मान्यता दिली
तसेच पूर्वीचे सुरू नसलेल्या घरकुल लाभार्थी यांचे घरकुल रद्द करणे बाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर सरपंच यांना प्रशासक असूनही हाय कोर्टाच्या आदेशानुसार अत्यल्प खर्चाचे अधिकार नसल्याने अनेक नागरी सुविधा ग्रामस्थांना देण्यात अडचण असल्याचे नमूद केले, लोकांच्या अडचणी समस्या समजावून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याचे आश्वासन प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी यांनीदिले. गावाला स्वच्छ पाणी पूर्ण दाबाने मिळावे पाण्याची नवीन टाकी तत्काळ सुरू करावी मूळ टाकीतूनच टी सी एल पावडर टाकलेले स्वच्छ पाणी गावातील सर्व विभागात टप्प्याटप्प्याने द्यावे ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहे तेथे मुरूम टाकावा त्याचबरोबर ग्रामपंचायत ने शासनाच्या आदेशानुसार घरपट्टी व पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवल्याने त्या तुलनेत ग्रामस्थांना मूलभूत सुविधा पुरवण्यात याव्यात काही ग्रामस्थांच्या मते वाडी वस्त्यांवर कोणत्याही सुविधा नसताना कर आकारला जातो, ग्रामपंचायत कर आमच्यावर लादु नये व कर कमी करणे बाबत वरिष्ठ कार्यालय किंवा शासन स्थरावर पत्र व्यवहार करावा अशी मागणी किसन मालुंजकर यांनी केली गावातील बहुतांश तरुणांच्या उपस्थिती व आक्रमकतेमुळे उत्साहाने आजचे ग्रामसभा गाजल्याचे चित्र पाहायला मिळाले ग्रामसभेला इतर विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. आजच्या ग्रामसभेला ग्रामपंचायत अधिकारी जी आर धराडे, पोलीस पाटील गोरक्ष शिंदे, प्रशासक रवींद्र मालुंजकर, बाळासाहेब मालुंजकर, अतुल लोहोटे, रमेश सावंत, शिवाजी सावंत, उपसरपंच भाऊराव मधे, सुभाष मालुंजकर आदींसह तरुण ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


