इतर

प्रवरा नदी संवर्धन प्रस्तावाला केंद्राचा हिरवा कंदील

 खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठपुराव्याला यश

अकोले  प्रतिनिधी 

प्रवरा नदी संवर्धन कामाच्या प्रस्तावाला केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी हिरवा कंदील दर्शविला आहे. अकोले नगरपंचायतीचे माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी केलेल्या मागणीची दखल घेत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी या प्रश्नासाठी विशेष पाठपुरावा

केला. या महत्त्वपूर्ण प्रस्तावावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दिले.आयएफसी या सल्लागार संस्थेला प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अकोले तालुक्यातील नदी प्रदूषणाचा प्रश्न आणि संवर्धनाची गरज लक्षात घेऊन माजी नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी नवी दिल्लीत या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला होता  शिर्डी लोकसभा मतदार संघांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे या कामाचे महत्त्व पटवून दिले.या निर्णयामुळे अकोले परिसरातील नद्यांचे पुनरुज्जीवन, प्रदूषण नियंत्रण आणि पाणी साठवणूक क्षमता वाढवण्याच्या कामांना मोठी गती मिळणार असल्याचे प्रमोद मंडलिक यांनी सांगितले. या यशाबद्दल खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि प्रमोद मंडलिक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

========

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button