ऐतिहासिक कामगिरीबद्दल रोटरी क्लब ऑफ नाशिकला मिळालीत सर्वोच्च 45 पारितोषिके

नाशिक प्रतिनिधी
2025 – 26 या वर्षात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व यशस्वीरित्या राबविलेल्या महत्त्वपूर्ण सामाजिक प्रकल्पाबद्दल रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 आयोजित ज्ञान – सन्मान पारितोषिक वितरण समारंभात रोटरी क्लब नाशिकला 45 पारितोषिके मिळालेली असून सदर क्लबने सर्वोच्च स्थान पटकाविलेले आहे. सदरचा पारितोषिक वितरण समारंभ नाशिकच्या गुरूदक्षिणा हॉलमध्ये संपन्न झाला.
रोटरी क्लब ऑफ नाशिकला प्रथम श्रेणितील उत्कृष्ट अध्यक्षाचा पुरस्कार डॉ गौरव सामनेरकर ह्यांना प्रदान करणात आला, त्याच्या सोबतच मानाचा सर्वोत्कृष्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर कप- 2025- 26, क्लब सर्व्हिस, उत्कृष्ट कामगिरी, उत्कृष्ट मुखपत्र, उत्कृष्ट नॉन मेडिकल प्रोजेक्ट, कुटुंब कल्याण संबंधी केलेले उत्कृष्ट कार्य, बेस्ट रोटरऍक्ट ऍक्टिव्हिटीज, उत्कृष्ट जनसंपर्क, फोर वे टेस्ट यासारख्या विविध क्षेत्रांशी संबंधित अशी 45 पारितोषिके मिळालेली आहेत.
2025- 26 या वर्षात डॉ. गौरव सामनेरकर हे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष होते, तसेच सचिव सी ए़ रेखा पटवर्धन व प्रकल्प सचिव आर्क.मकरंद चिंधडे होते. यावेळी प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, मोना सामनेरकर, ऍड. मनिष चिंधडे, सोनाली चिंधडे, ऋषिकेश सम्मनवार, मंगेश अपशंकर, स्मिता अपशंकर, अनिल सुकेनकर, ओम प्रकाश रावत, सुहास कुलकर्णी, डॉ. विश्वजित दळवी, रोहित देशपांडे आदी उपस्थित होते.



