इतर

“तीर्थक्षेत्र अरण” च्या विकासाला ‘निधी कमी पडू देणार नाही’- मुख्यमंत्री

मुंबई | दि. १९ ऑगस्ट २०२६

तीर्थक्षेत्र अरणच्या मातीत संत सावता महाराजांची पावन परंपरा आहे. या पवित्र भूमी “अरणच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. लवकरच भूमिपूजनासाठी मी स्वतः येतो,” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला .

अरण येथे नुकताच श्रीफळ हंडी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. या सोहळ्यानंतर राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मा.श्री. जयकुमार गोरे, संत शिरोमणी सावता महाराज यांचे वंशज गुरुवर्य सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज माळी, आबासाहेब खारे,शंकरराव बोरकर ,अमर हजारे, साखरचंद महाराज लोखंडे आदींनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.

यावेळी अरणच्या श्रीफळ हंडी सोहळ्यातील पवित्र श्रीफळाचा प्रसाद मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. गुरुवर्य सावता महाराज वसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना श्रीफळ, वारकरी टोपी आणि उपरणे देऊन सन्मान करण्यात आला.
या भेटीत अरण तीर्थक्षेत्राच्या विकासकामांबाबत तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या विषयांवर चर्चा झाली. संत सावता महाराजांच्या संजीवन समाधीस्थळाचा विकास, भाविकांसाठी सुविधा आणि अरण तीर्थक्षेत्राचा कायापालट याबाबत विविध मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “लवकरच भूमिपूजनासाठी मी स्वतः अरणला येतो आणि विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,” असा शब्द दिला.

यंदाच्या श्रीफळ तोरण सोहळ्यासाठी मानाचे श्रीफळदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्पण केले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या शब्दामुळे अरणच्या विकासकामांना नक्कीच गती मिळेल, अशी अपेक्षा अरणकर आणि सावता महाराजांच्या भक्तांमधून व्यक्त होत आहे.
संत सावता महाराजांची भूमी, अरणची ओळख आणि भाविकांची श्रद्धा जपण्यासाठी विकासाची कामे झाली पाहिजेत, ही अरणकरांची अनेक दिवसांची अपेक्षा आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांचा शब्द आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा पाठपुरावा यामुळे अरणच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button