इतर

‘कार्यक्षम गुरुकुल प्रमुख’ पुरस्काराने अंजुम तांबोळी यांचा सन्मान

सुपा, ता. पारनेर : रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात येणारा ‘मा. भास्करराव गलांडे पा. कार्यक्षम गुरुकुल प्रमुख’ हा मानाचा पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल, सुपा येथील शिक्षिका श्रीमती अंजुम सुबहान तांबोळी यांना रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदान करण्यात आला.

रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गुरुकुल प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन श्रीमती तांबोळी यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.

गुरुकुल प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्पोकन इंग्लिश, कला, क्रीडा, सर्जनशीलता, जीवनकौशल्ये, तंत्रज्ञान व विविध उपक्रमशील कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांनी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थ्यांना अनुभवाधारित, कृतीशील आणि आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देत गुरुकुल प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. ४ ऑक्टोबर रोजी पुरस्कार स्वीकारताना न्यू इंग्लिश स्कूल, सुपा परिवारासाठी हा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला.

श्रीमती अंजुम तांबोळी यांच्या या यशाबद्दल रयत उत्तर विभागाचे चेअरमन आ.रोहितदादा पवार, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, जनरल बॉडी सदस्य दादाभाऊ कळमकर,न्यू इंग्लिश स्कूल, सुपाचे मुख्याध्यापक मंगेश जाधव , शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, स्कुल कमेटी ग्रामस्थ,पालक यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या सन्मानामुळे विद्यालयातील गुरुकुल प्रकल्पाच्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button