इतर

वीज कंत्राटी कामगारांचे दिवाळीत बेमुदत कामबंद आंदोलन

06 / 10 / 2026

पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाची प्रदेश कार्यकारणी बैठक दि. 3 व 4 ऑक्टोबर रोजी पुणे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. राज्यभरातून सुमारे 80 पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकी दरम्यान ज्येष्ठ मार्गदर्शक मा.आण्णाजी देसाई तसेच भारतीय मजदूर संघाचे संघटन मंत्री मा.बाळासाहेब भुजबळ व अर्जुन चव्हाण यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

क्रिस्टल व स्मार्ट एजन्सी सह राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना दिवाळी पूर्वी बोनस, वेतन व फरकाची रक्कम मिळावी, जादा कामाचा मोबदला मिळावा, कामगार बदली धोरण रद्द करावे, कंत्राटदारांनी सूड भावनेतून कामगारांना एकतर्फी कमी करू नये, कोर्ट संरक्षित कमी केलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे व त्यांच्या याद्या संपर्क पोर्टल ला दाखवाव्यात कंत्राटदार बदलले तरी कामगार तेच रहावे व सेवाजेष्टते कामगारांना रोजगार मिळावा, मेडिक्लेम सुविधा उपलब्ध करावी व अन्य अनेक मागण्यासाठी 27 ऑक्टोबर रोजी सर्व जिल्ह्यात व महावितरण चे मुख्यालय प्रकाशगड बांद्रा मुंबई येथे आंदोलन करण्याचा निर्धार सर्वानुमते झाला.

मागील काळात केवळ आश्वासने मिळाली आता ठोस कृती हवी अन्यथा दिवाळीमध्ये 6 नोव्हेंबर पासून कामबंद करण्याचा निर्धार केल्याचे कार्याध्यक्ष राहुल बोडके यांनी सांगितले

मा.ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी 2024 साली स्पष्ट निर्देश दिल्यानंतर सुद्धा प्रशासनाकडून मुजोर कंत्राटदारांवर कारवाई होत नसल्याने जीवाची पर्वा न करता जनतेला वीज सेवा देणाऱ्या कामगारांवर प्रचंड आर्थिक व सामाजिक अन्याय होत आहे.

महाराष्ट्रात दुष्काळ पडला असून इकडे या कामगारांना अनेक महिने वेतन व मागील फरक नाही, प्रशासन केवळ आश्वासने देते मात्र पूर्ण करत नसल्याने दिवाळीत आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात म्हणाले

या बैठकीस कार्याध्यक्ष राहुल बोडके, संघटनमंत्री उमेश आनेराव, कोषाध्यक्ष सागर पवार व उपमहामंत्री अमर लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.

दोन दिवसातील विविध सत्रांत संघटनेच्या आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले. नवीन कार्यकारणीला नियुक्तीपत्रे देण्यात आली. बैठकीचे आभार प्रदर्शन पुणे झोन सचिव मा. श्री. योगेश महागरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button