आदिवासी समाजातील मुलींनी शिक्षणाच्या मदतीने समाजाचे नेतृत्व करावे – नितीन चंदनशिवे

–
राजूर /प्रतिनिधी-
आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र, पुणे व आदिवासी स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने राजूर येथे अकोले तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक गुणवंत मुलांचा सत्कार समारंभ ॲड देशमुख कॉलेज येथे मोठ्य उत्सवात संपन्न झाला ..
प्रास्ताविकात आदिवासी समाज कृती समितीचे अध्यक्ष इंजी. नामदेव गंभिरे यांनी संस्थेच्या 35 वर्षाचा आढावा घेऊन कु जया पुंगाटी या भामरागड येथिल आदिवासी मुलीची यशोगाधा उलगडून सांगितली . त्याच प्रमाणे आदिवासी समाजाने काही ठराविक आदिवासी कार्यकर्त्यांच्या मदतीने नाशिक येथील बिरसा मुंडा मेडिकल हब , तशेच भीमाशंकर येथील पोखरी कॉलेज ची निर्मिती केली असून पुण्यामध्ये 25 गरजू व गरीब मुलांना PMY योजनेतून घरे मिळवून दिली आहेत ..
आदिवासी लोकानी आदिवासी समाजाच्या शिक्षण , नोकरी आणि राजकीय आरक्षण ओरबडून खाल्लं आहे . अशाही परिस्थिती मध्ये मुलांनी खचून न जात संविधानातील आदिवासी समाजाला भरभरून दिलेली कलमांचा योग्य वापर करावा .पेसा व वनहक्क कायद्यांचा अभ्यास करून गडचिरोली तील मेंढा लेखा प्रमाणे सामुदायिकदावे

मंजूर करून वर्षाला एक कोटी 25 लाख च उत्पन्न केवळ बांबू व तेंदू पासून गावाला उत्पन्न मिळत असं आदर्श गाव असून शासनाने खूप पुरस्कार दिले आहेत . विशेषतः कातकरी बांधवांसाठी 65 घरकुले मंजूर करून घेणे तशेच त्यांच्या 51 कुटुंबासाठी जातीचे दाखले आदिवासी समाज कृती समितीच्या माध्यमातून मिळवून दिले आहेत .
स्वप्नदूत फाउंडेशन चे अध्यक्ष इंजि सुनील भांगरे यांनी स्वप्नदूत परिवाराच्या सहकार्याबद्दल सर्वच सदस्यांचे कौतुक करून.सर्वानी शिक्षणात चांगली प्रगती केली आहे . त्याच प्रमाणे महिला सदशांच्या बचतीतून पाच वर्षात सुमारे 25 लाखांचा निधी जमवला असल्याचे सांगितले ..
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या विनोदी शैलीत आदिवासी समाजातील रूढी आणि परंपरा सर्व समाजाला आदर्श असल्याचे नमूद करून शिकलेल्या मुलींनी आता होणाऱ्या नवऱ्याच्या घरी मुलगा बघायला जावे , व सोफ्यावर बसून मुलाच्या हातून कांदा – पोहे खायला काय हरकत आहे ?
मुलीचं आता समाज घडवण्याचं काम करतील असं त्यांच्या मार्कांवरून दिसून येत आहे . आदिवासींनी आता कांबळे या कवितेतील हातात तिरंगा व मांडीवर संविधान घेऊन फिरणाऱ्या ” कांबळे या व्यक्ती रेखेप्रमाणे संघर्ष करून आदिवासींना या गरिबीतून बाहेर काढले पाहिजे ..
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा चिंतामणराव भुरकुंडे यांनी विद्यार्थ्यांना मेहनत , जिद्द आणि चिकाटीने शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या संधीच सोन करावं , शिक्षणासाठी कृती समितीच्या वार्षिक अहवालातील डॉ प्रदीप आंबवणे लिखित शिक्षणाच्या वाटा हे सदर अभ्यासावे .. समाजात ज्या व्यक्ती , संघटना समाजाला सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाग घेऊन मदत करीत आहेत , त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांचं ऋण जाणावं कृतघ्न बनू नये असे विनम्रपणे सुचविले.

या कार्यक्रमात सुमारे ११० विद्यार्थ्यांना ट्रॉफी, पुस्तक आणि रोख रकमेचं वाटप करण्यात आलं. इयत्ता 10 वि मध्ये पुढील तीन मुलांनी रोख पारितोषिके पटकावली .. पल्लवी बांबळे (85.20), रुपाली धादवड (8520) दीपाली धादवड (84.60). या ज्ञानेश्वर शाळा शिळवंडी यांनी बाजी मारली . तर शासकीय आश्रम शाळा कोहणेच्या सानिका घोडे ( 84.60 ) या मुलीने तृतीय क्रमांक पटकावला .. त्याचप्रमाणे इयत्ता 12 वीचे गुणवंत पहिले तीन विध्यार्थी पुढील प्रमाणे आहेत ..अक्षदा कडाळी ( 86.50) कीर्ती धराडे ( 84.50). भाग्यश्री धिंदळे ( 77.50) टक्के गुण मिळवून सर्व मुलींनी उज्वल यश संपादन करून शासकीय आश्रम शाळा पैठण चे नाव उंचावले आहे. ..या वेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांपैकी किसन भोजणे, दत्तात्रय पडवळे ( RFO )सुदाम चपटे, खेवजी भोईर. गंगाराम सांगडे , भालेकर , दिनकर शैलकदे , खेवजी भोईर. राजेंद्र रेंगडे , किरवे , जंगले मते , भवारी , भालिंगे , इंजि विलास नवाळी , सागर गंभिरे , डॉ चंद्रकांत लहामटे , संजय गंभिरे , अशोक भवारी , नीता गोडे , संजय गोडे सांदण परिवार , राहुल राऊत – पर्यावरण प्रेमी , ऍड कोंडीराम पोपेरे , ck भांगरे , मयूर बांबळे , सचिन भांगरे , अशोक भवारी , हभप नानासाहेब गंभिरे यांचा आंब्याचं रोपटं , तुकाराम मुंढे IAS यांच्या जीवनावरील पुस्थक ” तुकाराम ” भेट देण्यात आलं ,शाळेतील शिक्षकांना संविधान भेट देण्यात आलं , पालकांना आंब्याचं रोपटं व बेलाचं झाडं भेट देण्यात आलं आहे . विलास तुपे सर यांनी छाया चित्रण केलं , कॉलेजच्या भांगरे सरांनी कार्यक्रम देखणा होम्यासाठी खूप मेहनत घेतली .,
गंभिरेवाडी ZP शाळेच्या चिमुकल्यानी स्वागत गीत व गोंडी गीतावर सुंदर नृत्यू करून प्रेक्षकांची मने जिंकली .. यासाठी बगाड सर , कदम सरांनी खूप मेहनत घेतली . पाहुण्यांचे हस्ते व पर्यावरण प्रेमी राहुल राऊत यांचे हस्ते कॉलेज मैदानावर वृक्ष रोपण करण्यात आले .. मा विकास व प्रणिता गोडे या जोडीने सुंदर सूत्रसंचालन केले .
दीपक गंभिरे , उपाध्यक्ष स्वप्नदूत फाउंडेशन मुंबई यांनी आभार प्रदर्शन करून , स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली …
=======


