इतर

रोटरी क्लब नाशिकच्या इंटरॅक्ट क्लब इन्स्टॉलेशन चा कार्यक्रम संपन्न.

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या इंटरॅक्ट क्लब इन्स्टॉलेशन चा कार्यक्रम श्री अतुल लाढीया (व्यक्तिविकास तज्ज्ञ, बिजनेस कोच) यांच्या प्रमुख उपस्थितीत व रोटरी क्लब नाशिकच्या अध्यक्षा शिल्पा पारख यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच संपन्न झाला.

यावेळी डॉ़अनिता नेहेते तसेच विजय दिनानी यांनी रोटरीच्या स्किन बँकेविषयी उपयुक्त माहिती सांगितली. डॉ. सुनिता संकलेचा यांनी सीपीआर बद्दल माहिती देऊन त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
रोटरी क्लब इंट्रॅक्ट तर्फे चालू वर्षी उद्याच्या सुरक्षित भविष्याकरिता जनतेच्या मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करणे,मेडिकल चेकअप कॅम्प घेणे, तंबाखू विरोधी मोहीम राबविणे तसेच विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये विविध प्रकारची कौशल्य कशा पद्धतीने आत्मसात करावित यासंबंधीचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करणे आदी विविध प्रेरणादायी उपक्रम राबविणार आहे.
यावेळी रचना ट्रस्ट संचलित आधाराश्रम धोंडेगाव, आर के कलानी ज्युनिअर कॉलेज , सिंधू सागर अकॅडमी स्कूल, अशोका युनिव्हर्सल ज्युनिअर कॉलेज अर्जुन नगर, एम एस कोठारी अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेज,उन्नती सेकंडरी स्कूल, रंगुबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम स्कूल,प्रावर्षी इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब वैशंपायन स्कूल, लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय सावता नगर, विज्डम हायस्कूल, ग्लोबल व्हिजन इंग्लिश स्कूल, ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल, अण्णासाहेब वैशंपायन स्कूल महात्मा नगर, नर्गिस दत्त स्कूल,के जे मेहता हायस्कूल, रामशेज जूनियर कॉलेज, रामशेज ज्युनिअर स्कूल आदी शाळा उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षा सौ शिल्पा पारख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणाली देशपांडे व सुप्रिया मंगरूळकर यांनी केले. ऋषिकेश सम्मनवार यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोग्राम कमिटीचे सोनाली शिंदे नेहा मेहेर,पराग जोशी, लीना बाकरे लिना कुलकर्णी, मोना सामनेरकर,देवधर वैशाली रावत सुचिता महादेवकर यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास गौरव सामनेरकर, अनिल सुकेनकर, दिलीप बेनिवाल आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button