खिरवीरे येथे नवचेतना व आधारशिला मेळावा संपन्न

प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
दि. १२ अकोले तालुक्यातील खिरवीर येथे नवचेतना व आधारशिला मेळावा उत्साहात संपन्न झाला.
या मेळाव्याच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या नवचेतना व आधारशिला उपक्रमाचे महत्त्व पटवून देण्यात आले. यासाठी नाविन्यपूर्ण स्टॉल उभारण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे महत्त्व उपस्थित असलेल्या माता-पिता व पालकांना हे समजावून सांगण्यात आले. यावेळी गटाच्या पर्यवेक्षिका श्रीमती इंदिरा जयराम सोनवणे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. पालकांनी बालविकास प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले. पोषण माह २०२६ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. “आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी” या संकल्पने अंतर्गत अंगणवाडीच्या गुणवत्ता पूर्ण कार्यात पालक व समुदायाच्या सहभागाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.

यावेळी उपसरपंच श्री सुभाष बेनके , सौ. रंजना नितीन दिंडे, सौ.पार्वताबाई भीमा डगळे, श्री त्र्यंबक शंकर पराड, श्री लालू बहिरू डगळे, सौ रंजना पराड, सौ द्रौपदा रावते, सौ यमुना बेंडकोळी,खिरविरे परिसरातील सर्व बचत गट महिला,अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका, आशा पर्यवेक्षिका ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितानी पोषण माहची शपथ घेतली..


