इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.१६/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. २५ शके १९४८
दिनांक :- १६/०९/२०२६,
वार :- सौम्यवासरे(बुधवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३०,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति ०९:००,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति १७:२३,
योग :- वैधृति समाप्ति १२:२३,
करण :- कौलव समाप्ति २१:५०,
चंद्र राशि :- तुला,(१०:४९नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- सिंह – उत्तरा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- १७नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:२४ ते ०१:५८ पर्यंत,

♦ लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:१८ ते ०७:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:२४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०४:५८ ते ०६:३० पर्यंत,

❀ दिन विशेष:
अमृत १७:२३ नं., घबाड १७:२३ नं., षष्ठी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. २५ शके १९४८
दिनांक = १६/०९/२०२६
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
महत्त्वाच्या कामांमध्ये काळजी घ्या. जास्त मेहनत करावी लागेल, परंतु कुटुंबाची साथ मिळाल्याने संध्याकाळपर्यंत कामे मार्गी लागतील.

वृषभ
टीमवर्कमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक व्यवहार करताना आज विशेष काळजी घ्या.

मिथुन
मेहनत रंग आणेल आणि प्रगतीच्या नवीन वाटा खुणावतील. नवीन लोकांशी व्यवहार करताना सावध राहा.

कर्क
प्रभावशाली व्यक्तींची भेट होईल. अतिरिक्त कमाईचे आणि धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात.

सिंह
वैयक्तिक आणि खाजगी बाबींना प्राधान्य द्या. अनावश्यक वादविवाद व गरमागरमी टाळा.

कन्या
घरात आनंदाचे वातावरण राहील. व्यावसायिक प्रवासातून चांगला नफा मिळू शकतो.

तुळ
पाहुण्यांच्या आगमनाने घरात उत्साह वाढेल. आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल.

वृश्चिक
नशीब आज तुम्हाला पूर्ण साथ देईल. मान-सन्मानात वाढ होईल, पण निर्णय घेताना घाई करू नका.

धनु
सासरच्या मंडळींकडून धनलाभ किंवा आकर्षक प्रस्ताव मिळू शकतात. तुमची चतुराई फायदेशीर ठरेल.

मकर
करिअरमध्ये वेगाने प्रगती होईल. रखडलेली कामे पुन्हा सुरू झाल्यामुळे मन प्रसन्न राहील.

कुंभ
वाद-विवादापासून दूर राहा. आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत आजचा दिवस सावध राहण्याचा आहे.

मीन
अहंकार टाळा आणि गोड बोला. रखडलेले महत्त्वाचे काम पूर्ण होईल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button