इतर

जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश


प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
आष्टा : दि. १७ रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टा येथील विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय शालेय वुशू स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई केली.
विद्यालयातील कु. सानिका विकास जाकलेकर (इयत्ता ११ वी विज्ञान) हिने ७० किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची विभागीय शालेय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच कु. वैभवी नवनाथ लवटे (इयत्ता ८ वी) हिने ५० किलो वजन गटात रौप्यपदक (उपविजेतेपद) मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.
या दोन्ही विद्यार्थिनींना कोच आशुतोष पाटील सर, कॅप्टन नवनाथ लवटे सर व थर्ड ऑफिसर अभिषेक साळुंखे सर यांचे मार्गदर्शन लाभले.


विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री. देवकाते के. एस., पर्यवेक्षक श्री. पाटील आर. बी. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु. सानिका जाकलेकर हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“शिस्त, सामर्थ्य आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरावर आपल्या विद्यालयाचा नावलौकिक उंचावला आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button