विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण चिंतनीय – डॉ अनिल गुंजाळ

शालेय मुलांसोबतच पदवी परीक्षा, आय .आय .टी , एम डी , उच्चस्तरीय पदवी मधील विद्यार्थी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. ही वस्तुस्थिती खूप चिंतनीय आहे . मेडिकल , इंजिनिअरिंग यांच्या प्रवेशाच्या वेळी पण हेच घडते , अभ्यास करताना अतितान यामुळे पण असे प्रसंग घडतात . यावर शिक्षण व्यवस्था , शासन , पालक शिक्षक यांनी विचार करण्याची वेळ आली आहे
अजून किती आत्मघात आपण पाहणार आहोत
“मुलांनो आयुष्य खूप सुंदर आहे, खूप मार्ग आहेत ” म्हणून आवडीने निवडा नाही तर आवड निर्माण करा.
पालक आणि शिक्षकांनी मुलांशी संवाद साधा . समुपदेशक यांचा सल्ला घ्या.
आयुष्य एकदाच मिळते त्याही पेक्षा साध्य करिअरच्या असंख्य संधी आहेत.
पालकांनी विशिष्ट शाखेचा आग्रह धरू नका.
मला वाटते या सर्व आत्मघाता च्या मागे दबाव, अपेक्षा आहेत मुलांनो हे झुगारून बोला पालकांना तुम्ही हवे आहेत. ते नक्की समजतील . आत्मशोध घ्या आत्मसन्मान जागा करा आणि आनंदने जगा आई , वडील , शिक्षक, देश समाज यांची सेवा करा. गरज असेल तर बोला मी आपल्या सोबत आहे .
आपलाच
डॉ अनिल गुंजाळ,
समुपदेशक , व्याख्याता, माजी शिक्षणाधिकारी पुणे
9404 235145



