इतर

आदिवासी महिला बचत गट मेळावा व शासकिय सेवा शिबीर

प्रशासनाने गतिमान होऊन काम करावे-आ.डॉ किरण लहामटे…

अकोले प्रतिनिधी

शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने अधिक गतिमान होण्याची गरज आहे. नागरिकांना शासकीय सेवांसाठी वारंवार शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी सर्व शासकीय योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असे मत आमदार डॉ किरण लहामटे यांनी व्यक्त केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय राजूर, सेवा संकल्प अभियान राणी दुर्गावती जयंती निमित्त आदिवासी महिला बचत गट मेळावा व शासकिय सेवा शिबीर सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर, २०२६ रोजी राजूर येथे पार पडले. यावेळी श्रीम. देवकन्या बोकडे प्रकल्प अधिकारी तहसीलदार सिद्धार्थ मोरे, अमर माने गटविकास अधिकारी, केदार नांगरे महिला व बालविकास विभाग, दत्तात्रय पडवळ वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीम. प्रतिभा सोनवणे, अतुल पवार कृषी अधिकारी, मनोज पैठणकर तुषार पवार, योगेश ढोणे, दीपक कालेकर, संजय सुसलादे लेखा अधिकारी व प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी वृंद उपस्थित होते.

राज्य सरकारच्या वतीने दि. १७ सप्टेंबर ते दि. १७ ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान २०२६ राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्यांचा प्रत्यक्ष लाभसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, तसेच नागरिकांच्या अडचणींचे स्थानिक पातळीवर निराकरण व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. आदिवासी मेळावा व शासकीय सेवा शिबीर प्रसंगी महसूल विभागामार्फत जातीचे दाखले, उत्पन्न व रहिवासी दाखले, आधार सेवा, वनहक्क आदिवासी महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी उपलब्ध योजनांची माहिती देण्यात येऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर संबंधित विभागांनी तत्काळ कार्यवाही करावी. प्रशासन व नागरिकांमधील संवाद वाढल्यास अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लागू शकतात. पात्र लाभार्थी शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाहीत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन आमदार लहामटे यांनी केले.

यावेळी नागरिकांनी विविध समस्या व मागण्या प्रशासनासमोर मांडल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले. एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

तसेच सेवा संकल्प अभियान २०२६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनहक्क अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारित नियम २०१२ च्या प्रभावी अंमलबजावणी अंतर्गत ७ आणि १२ E चे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी श्रीम. पुष्पाताई लहामटे, श्रीम. नीता आवारी, उमेदचे कुंदन कोरडे, प्रकल्प कार्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी श्रीम. देवकन्या बोकडे यांनी केले तर सूत्रसंचालन नवनाथ गायकवाड आभार सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक कालेकर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button