ब्रतुकम्मा’ सोहळ्यांसाठी’लोकनृत्य’ मोफत शिकवणार…

‘पद्मशाली सखी संघम’चा उपक्रम
सोलापूर : नवरात्रोत्सवात तेलुगू भाषिक महिला, युवती आणि मुली अष्टमीच्या दिवशी विविध प्रकारांच्या फुलांचा थर रचून ‘त्या’ भोवती फेर धरुन ‘लोकनृत्य’ केले जाते. फुलांचा थर रचलेल्यास ‘ब्रतुकम्मा’ म्हटले जाते. ही परंपरा सोलापूरात अनादी काळापासून सुरु आहे. सध्याच्या काळात तेलुगू भाषिकांची परंपरा, संस्कृती लोप पावत आहे का ? ‘ब्रतुकम्मा’ भोवती ‘लोकनृत्य’ खेळण्याची परंपरा असून, यासाठी सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित ‘पद्मशाली सखी संघम’च्या वतीने हा ‘लोकनृत्य’ तीन दिवसांसाठी मोफत (विनामूल्य) शिकवणार आहेत. अशी माहिती, पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षा कला चन्नापट्टण यांनी ही दिले आहे
तेलंगणा राज्यात नवरात्रोत्सवात पहिल्या दिवसांपासून ‘ब्रतुकम्मा’ भोवती फेर धरुन ‘लोकनृत्य’ करतात. जवळपास नऊ दिवस ‘ब्रतुकम्मा’ तयार करण्याची परंपरा आहे. ‘येंगीलाफुव्वा’, ‘अटकुला’, ‘मुद्दापप्पू’, ‘नानबिय्यम’, ‘अटला’, ‘अलगिना’, ‘वेपकायला’, ‘वेन्न मुद्दूला’, ‘सद्दुला’ अशाप्रकारे ९ दिवसांसाठी ‘नांवे’ असतात. विविध फुलांचा थर रचून ‘ब्रतुकम्मा’ भोवती सर्वच वयोगटातील ‘स्त्री’ मोठ्या उत्साहात, आनंदात फेर धरतात, ही परंपरा आजही कायम आहे.
हे ‘लोकनृत्य’ हैदराबाद रोड वरील जुना विडी घरकुल, महालक्ष्मी चौकाजवळील, एमसीईबी लाईट कंपाऊंड शेजारील राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळा येथे दि. १२, १३ व १४ ऑक्टोंबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत रेखा रुद्रोज या शिकवणार आहेत. ज्यांना शिकण्याची आवड आहे, अशांनी 9021551431या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असे आवाहन मेघा इट्टम, पल्लवी संगा, आरती आडम, ममता तलकोकूल, वनिता सुरम, वंशिका जक्का, कल्पना कट्टा, गीता भूदत्त, हेमा मैलारी, कविता साखरे, अंबिका म्याकल, रोहिणी संगा, प्रिती बोगा, वर्षा चिप्पा, लता कुंदारम, सुनिता वग्गा, सुनिता दारा, सुरेखा आडम, सोनाली तुम्मा, लावण्या मदनाल, पद्मा मेडपल्ली, अनुराधा बुरा, कनकलक्ष्मी तुम्मा यांनी केले आहे.



