इतर

ज्ञानाची भूक आणि संस्काराची शिदोरी असेल तर यश आपलेच : डॉ. बाबुराव उपाध्ये

संजय उकिरडे
श्रीरामपूर () शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची संजीवनी असून गरिबी कधी शिक्षणाच्या आड येत नाही, त्यासाठी फक्त ज्ञानाची भूक आणि संस्काराची शिदोरीच आपले जीवनशिल्प घडवते. तेच खरे आपले यश होय,असे अनुभवी विचार वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर कांदा मार्केट परिसरातील प्रिझम अकॅडमी मध्ये आयोजित यशस्वी विद्यर्थ्यांचे गुणधर्म या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. बाबुराव उपाध्ये अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष डॉ. शिवाजी काळे उपस्थित होते. अकॅडमी तज्ज्ञ संचालक प्रा. किशोर खटाणे पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून सत्कार केला. तज्ज्ञ संचालक. प्रा. सूरज वाडेकर यांनी उपक्रमाची भूमिका विशद केली. अकॅडमीचे प्रा. वर्षाताई गंगावणे, प्रा. सचिन चव्हाण, प्रा. अभिजित महानोर यांनी उपक्रमांचे नियाजन केले.

आजच्या विद्यार्थ्यांनी योग्य सुविधांचा उपयोग करून घ्यावा : – डॉ. शिवाजी काळे प्रमुख पाहुणे डॉ. शिवाजी आपल्या व्याख्यानात म्हणाले,आमच्या काळात गावी शिक्षणाची व्यवस्था नव्हती. आईने शेतात काबाडकष्ट करीत, प्रसंगी धुणी – भांडी करून आम्हाला शिकविले. प्रचंड गरिबी होती. कोणत्याच सुविधा नव्हत्या, आजच्या विद्यार्थ्यांना आईबाप भरपूर मदत करतात. नवे तंत्रज्ञान हाती आले आहे. ज्ञानाची क्षितिजे वाढली आहेत. लाभलेल्या सुविधांचा आजच्या विद्यार्थ्यांनी योग्य उपयोग करून घ्यावा, हेच यशस्वी विद्यार्थ्यांचे गुणधर्म आहेत. असे सांगून शिक्षणाला वय नाही उत्कट इच्छाशक्ती हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी प्रिझम अकॅडमीची आदर्श गुणवत्ता, संस्काराचे विविध उपक्रम नियोजनाबद्दल संचालकांचे कौतुक केले. तज्ज्ञ संचालक प्रा. किशोर खटाणे पाटील व प्रा. सूरज वाडेकर यांचे विशेष कौतुक केल. प्रा. वर्षाताई गंगावणे तसेच काही गुणवान विद्यार्थ्यांना पुस्तके देऊन त्यांचे डॉ. उपाध्ये यांनी सत्कार केले. वाचन संस्कृती ही जीवनसंस्कृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आईबाप, घरदार आणि कोणी आधार नसताना मी शिक्षण घेतले. आज तुम्हाला सर्व सुविधा आहेत, त्यामुळे जीवन यशस्वी बनवा. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे अग्निपंख वाचा असे आवाहन करून धर्म,जाती, पंथ, वर्ग यापेक्षा माणसात आणि शिक्षणात देव शोधावा असे आवाहन केले. यावेळी चित्रपट अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल डॉ. उपाध्ये यांनी शोक व्यक्त करून अशी देवमाणसं निघून जाणे खूपच दुःखदायक आहे. अशी श्रद्धांजली वाहिली. प्रा. सूरज वाडेकर यांनी समारोप करून आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button