इतर

शेलविहिरे ता अकोले येथे बीट स्तरीय निपुण अभ्यासवर्ग कार्यशाळा संपन्न.


प्रतिनिधी/ श्री एस. के. जाधव
शेलविहिरे, दि. ८ : अकोले तालुक्यातील शेलविहिरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी बीटस्तरीय निपुण अभ्यासवर्ग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी अध्ययनसमृद्ध वातावरण निर्माण करणे, आवश्यक शैक्षणिक साहित्याची निर्मिती तसेच वाचन-लेखन उपक्रमांना चालना देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेत गणित, संख्यावाचन, लेखन, बेरीज-वजाबाकी, संबोध व सहसंबंध आदी विषयांवर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक साहित्य निर्मिती व त्याची निवड याबाबत श्री. युवराज तळपे यांनी मार्गदर्शन केले. तसेच श्री. बाळू खाडे व नवनाथ वाकचौरे यांनी गणित विषयातील विविध उपक्रमांचे सुलभीकरण केले.


दुपारच्या सत्रात गटशिक्षणाधिकारी धुमाळ साहेब यांनी कार्यशाळेस भेट देऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी श्री. जनार्दन भांगरे यांनी मिशन आरंभाबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी श्री. ज्ञानेश्वर माळवे यांनी संपूर्ण कार्यशाळेचा आढावा घेत प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी श्री. विजय भांगरे केंद्रप्रमुख खिरविरे, श्री. विशाल चव्हाण, केंद्रप्रमुख पिंपळकणे, श्री. राम ओहळ, केंद्रप्रमुख मान्हेरे तसेच इयत्ता पहिली ते पाचवीचे शिक्षक उपस्थित होते.
कार्यशाळेमुळे शिक्षकांना निपुण भारत अभियानाच्या अनुषंगाने विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला अधिक प्रभावी व आनंददायी बनविण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button